-->

फ़ॉलोअर

तुमसर तहसीलदार व उपविभागिय अधिकारी निलंबित

तुमसर तहसीलदार व उपविभागिय अधिकारी निलंबित

 

तुमसर (भंडारा जि.प्रति.) :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात वाळू तस्करी रोखण्यास संपूर्णतः अपयशी ठरून, साठेबाजीलसा मदत करणाऱ्या दोन महसूल अधिकाऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबित केले. तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व तहसीलदार मोहन टिकले यांना निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भात भाजप नेत माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कारवाई सुरू झाली होती. 

तुमसर तालुक्यातील वाळू तस्करीसंदर्भात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारी गटाचे आमदार राजू कारेमोरे यांनी तक्रार केली होती. परंतु त्यांच्या तक्रारीला त्यावेळी अधिक महत्व प्राप्त झाले, ज्यावेळी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली. डॉ. फुके यांनी वाळू तस्करांसोबत अधिकाऱ्यांच्या असलेल्या साटेलोट्याबाबत पुरावेही दिले होते. त्यानंतर तातडीने मुख्यमंत्री फडणवीस यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

निलंबित अधिकारी नवविवाहित 

महसूल विभागातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. यापैकी एक अधिकारी नवविवाहित आहेत. या अधिकाऱ्यानं स्पर्धा परीक्षांसंदर्भात तरुणांना मार्गदर्शनही सुरू केलं होतं. प्रशासकीय अधिकारी म्हणून जनतेची सेवा कशी करता येते, हे या अधिकाऱ्यांना तरूणाईला पटवून दिलं होतं. मात्र याच अधिकाऱ्याविरोधात वाळू तस्करांशी संबंध असल्याचा ठपका आता ठेवण्यात आला आहे. महसूल विभागातील या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात नागपूरच्या विभागीय महसूल आयुक्तांनी चौकशी केली होती. त्यात दोन्ही अधिकारी भ्रष्टाचारात लिप्त असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या अहवालाच्या आधारावरच या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयानं सांगितलं. भंडारा जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन रोखण्याबाबत सरकारनं लगाम कसला. त्यानंतर वाळू माफियांशी काही अधिकाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप झाला. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या अपघातात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत विधान सभेत लक्षविधी मांडण्यात आली होती. या लक्षवेधीवरील चर्चेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणी सात दिवसात विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले होते.

जिल्हाधिकारी मैदानात 

महसूल विभागातील डेप्यूटी कलेक्टर आणि तहसीलदार निलंबित झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. सरकारनं लगाम कसल्यानंतर भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी आता मैदानात उतरले आहेत. भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 9 एप्रिल रोजी अचानक काही ठिकाणी छापे घातले. त्यामुळं सरकारनं कारवाईचा बडगा उगारताच सगळे सुतासारखे सरळ झाल्याचं दिसत आहे. महसूल मंत्र्यांनी लावलेल्या चौकशीत तुमसर भागात गौण खनिज तस्करी प्रकरणी अनेक मुद्दे पुढे आलेत. पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता हा प्रकार सुरू होता. परवानगी नसतातना वाळू घाटांमधून वाळूचे उत्खनन झाल्याचे आढळून आले. हा प्रकार अत्यंत गंभीर होता. या संपूर्ण प्रकरणात तुमसरचे उपजिल्हाधिकारी दर्जाचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व तहसीलदार मोहन टिकले यांचा सहभाग असल्याचं आढळलं. त्यामुळं सर्वंकष चौकशी केल्यावर दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला.

अवैध वाळू उत्खनन व साठेबाजी हा अतिशय गंभीर प्रकार आहे. सामान्य नागरिकांच्या हक्काच्या वाळूवर बेकायदेशीर डल्ला मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात जिथे कुठे होईल, तिथे हाणून पडला जाईल. राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून गंभीरपणे लक्ष द्यावे, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कारवाईच्या निमित्तानं स्पष्ट केलं आहे.

0 Response to "तुमसर तहसीलदार व उपविभागिय अधिकारी निलंबित "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article