
महाविहार व इ.व्ही.ऐम मुक्ति राष्ट्र्व्यापी 'जेल भरो' आंदोलन
- महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन व १९४९ चा क़ायदा रद्ह करण्यात यावा व महाविहार हा बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावा
- ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपर ने चुनाव करण्यात यावा
भंडारा प्रति. :- शेतमालाला हमीभाव, शेतकरी हक्क मूल्य व भावांतर मूल्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या इतरही मागण्यांना घेवुन आज दि.९ एप्रिल रोजी राष्ट्रीय किसान मोर्चा तर्फे 'जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच याच आंदोलनाचा एक भाग म्हणुन १ जुलै २०२५ रोजी भारत बंद चे आयोजन करण्यात आले आहे. सोयाबीन, कापूस यांसह खरीप व रब्बी हंगामातील सर्व प्रकारच्या शेतमाल खरेदीसाठी कायम स्वरूपी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रे सुरू ठेवण्यात यावे, महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील शिफारशीत हमीभाव व केंद्र सरकार मार्फत घोषित हमीभाव यातील फरकाची रक्कम अर्थात "शेतकरी हक्क मूल्य" तसेच केंद्र सरकार मार्फत घोषित हमीभाव व कृषी उत्पन्न बाजार समित्या मधे प्रत्यक्ष मिळणारा भाव यातील फरकाची रक्कम अर्थात "भावातर मूल्य" प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात यावे यासह शेतकऱ्यांच्या हिताच्या इतरही मागण्यांना घेवुन महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन व १९४९ चा क़ायदा रद्ह करण्यात यावा व महाविहार हा बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावा व ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपर ने चुनाव करण्यात यावा हे आंदोलन करण्यात आले.
0 Response to "महाविहार व इ.व्ही.ऐम मुक्ति राष्ट्र्व्यापी 'जेल भरो' आंदोलन "
एक टिप्पणी भेजें