डॉ.अक्षय कहालकर महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
- अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचा पुढाकार
संजीव भांबोरे
भंडारा :- तालुक्यातील टेकेपार( माडगी )येथील रहिवासी व सर्वसामान्य कुटुंबातील हसतमुखत असलेली व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. अक्षय ईस्तारी कहालकर यांच्या सामाजिक, पत्रकारिता ,व वैद्यकीय क्षेत्रातील कामाची देखभाल घेऊन अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे , प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे व सामाजिक कार्यकर्ते आसित बागडे भंडारा व सामाजिक कार्यकर्ते भारत कांबळे अड्याळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारा येथे साई मंदिर समोर त्यांच्या सुरू असलेल्या दवाखान्यात अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने आज दिनांक 8 एप्रिल 2025 ला सायंकाळी 5 वाजता सन्मानचिन्ह, शाल, व गुलाबाच्या फुलाचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. अक्षय कहालकर म्हणाले की, आपण माझ्या कार्याची दखल घेऊन माझा तो जो सन्मान केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे व आपले हे ऋण आयुष्यात कधीच विसरणार नाही असे सुद्धा यावेळी ते म्हणाले. यावेळी पल्लवी रोडगे, पंकज कहालकर, गरीबदास टेंभेकर भंडारा प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Response to " डॉ.अक्षय कहालकर महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराने सन्मानित "
एक टिप्पणी भेजें