शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी
संजीव भांबोरे
भंडारा :- पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे सम्राट अशोक यांची 2329 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सर्व पाहुण्यांचे उपस्थितीत तथागत गौतम बुद्ध ,सम्राट अशोक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम ,यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले .त्यानंतर संपूर्ण भिक्षू संघाच्या उपस्थितीत संघ वंदना घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध होते.यावेळी पत्रकार संजीव भांबोरे ,धम्मचारींनी प्रज्ञा सखी, ब्रह्मचारी भदंत वज्रपाणी, गुलाब घोडशे , यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून श्यामलाल रामटेके माजी सरपंच, भदंत संघानंद, श्रामनेर बुद्पाल, दिलीप घोडके उपस्थित होते. सदर कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गोंडाणे नागपूर यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे संचालन विनय ढोके यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगाधर गजभिये यांनी तर आभार आशिष मेश्राम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता पंकज वानखडे, प्रशांत बोदेले, प्रशांत कांबळे, दीपक वालदे ,राकेश मेश्राम, प्रमोद वासनिक ,अंबादास मेश्राम,त्रिसरण उके यांनी सहकार्य केले.
0 Response to "शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी "
एक टिप्पणी भेजें