महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ध्येयनिष्ठ अधिकारी ग्रुप (महाराष्ट्र) तर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी) :- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ध्येयनिष्ठ अधिकारी ग्रुप महाराष्ट्र तर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आलेली आहे.ह्यात एकुण प्रत्येकी सहा क्रमांक ठेवण्यात आलेले आहेत. विजेत्यांना प्रत्येकी 3001₹, 2001₹,1001₹, 501₹, 251₹, 125₹ ह्या प्रकारे रोखरक्कम दिली जाणार असून प्रत्येक सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता श्री.जिवनप्रकाश गेडाम +91 74101 19450 ह्यांच्या फोन पे / गुगल पे वर 51₹ पाठवून रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा ठेवलेली आहे.परीक्षा ही 18 एप्रिल ला शुक्रवारी गुड फ्रायडे सुट्टीच्या दिवशी दुपारी 12 ते 12.30 दरम्यान व्हाट्सअप ग्रुप वर ठेवलेली आहे. जास्तीच जास्त स्पर्धक सहभागी व्हावे असे आव्हान, श्री.परवेश मेश्राम ध्येयनिष्ठ अधिकारी ग्रुप व श्री.अक्षय देशमुख सर वैद्यकीय /मन चिकित्सक, सामाजिक कार्यकर्ता हयांनी केलेले आहे.
0 Response to "महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ध्येयनिष्ठ अधिकारी ग्रुप (महाराष्ट्र) तर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन"
एक टिप्पणी भेजें