-->

फ़ॉलोअर

हरदोली येथे सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रमाला भेट दिली :-आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे

हरदोली येथे सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रमाला भेट दिली :-आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे

  • एक मंच, सात जोडपी, एक संदेश — हरदोलीत सामूहिक विवाह सोहळा थाटात पार 
तुमसर :- हरदोली या छोटेखानी पण सामाजिकदृष्ट्या सजग गावाने आज एक आगळावेगळा सामाजिक इतिहास घडवला. गावात सदाशिव ढेंगे यांच्या पुढाकारातून व शिवाजी सुशिक्षित बेरोजगार संस्था यांच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रविवारी उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे*व रंजीताताई राजू कारेमोरे  *उपस्थितीत राहून सर्व. नव वधू- वरांना भावी वैवाहिक जीवनाकरिता शुभेच्छा दिल्या.सोहळ्यात ७ जोडप्यांनी एकमेकांच्या सहजीवनाचा स्वीकार करत विवाहबंधनात अडकले.या सामूहिक विवाह सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सर्वधर्मीय सहभाग. विविध धार्मिक व सामाजिक पार्श्वभूमीतून आलेल्या वधू-वरांनी एकाच मंचावर शुभमहालात विवाहबद्ध होत सामाजिक एकतेचे अनोखे उदाहरण साऱ्यांसमोर ठेवले.सामूहिक विवाह ही केवळ गरिबीवर उतारा म्हणून पाहण्याची गरज नाही, तर ती सामाजिक समरसतेची, आर्थिक शिस्तीची व मानवी एकतेची प्रेरणादायी पद्धत बनली आहे. या विवाह सोहळ्याद्वारे केवळ दोन व्यक्ती नव्हे, तर दोन कुटुंबे, समुदाय एकत्र आले. गावातील नागरिक व नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा कार्यक्रम सामाजिक सौहार्दाचे प्रतीक ठरला.या समारंभास खा. प्रशांत पडोळे, आ. राजू माणिकरावजी कारेमोरे, मधुकर कुकडे, शुभांगी सुनील फुंडे, नाना पंचबुधे, धनंजय दलाल, जि.प.उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, सभापती नरेश ईश्वरकर, छगन बिलोरे, देवा इलमे, महादेव पचघरे, माधोराव बांते, प्रदिप बुराडे, दिलीप सार्वे, परमेश नलगोपुलवार, रिता हलमारे, रंजिता कारेमोरे, सदानंद इलमे, गजानन इलमे, सूर्यकांत सेलोकर, ओमप्रकाश चोले, पंढरीनाथ झंझाड, विलास झंझाड, मोरेश्वर झंझाड, मंगेश धांडे, ज्ञानेश्वर माटे, इंजि राहुल बुरडे, अल्का झंझाड (सरपंच), मोहपत झंझाड , शुभम घोणमोडे, अतुल फेंडर, दिनेश बांते, भाग्यश्री धांडे, दिक्षा माटे, बिंदू झंझाड, निशा झंझाड, डाॅ नारायण झंझाड, डाॅ हिमांशु मते, देवराम झंझाड, सुधाकर गायधने, अनिल झंझाड, शशिकांत गायधने, पिंटु राघोर्ते, पंकज ढेंगे, लक्ष्मीकांत सार्वे, विनोद जगनाडे, दिगांबर झंझाड, राजु बुरडे, गोकुळ गायधने, महेंद्र झंझाड अनेक मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामपंचायत हरदोलीच्यावतीने प्रत्येक वधूस माहेरची साडी भेट स्वरूपात देण्यात आली, हे या सोहळ्याचे आणखी एक भावनिक आणि कौतुकास्पद वैशिष्ट्य ठरले.हरदोली गावाने आज एका ऐतिहासिक सामाजिक उपक्रमाद्वारे समरसतेचा नवा अध्याय लिहिला असून, हा सोहळा इतर गावांसाठी प्रेरणास्थान ठरणार यात शंका नाही.आयोजक सदाशिव ढेंगे  पुढे म्हणाले गरजू वधू-वरांच्या पाठीशी उभं राहणं हा आमचा मुख्य हेतू असून, सामाजिक सामंजस्य व एकतेचा संदेश देणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. पुढेही असे विवाह सोहळे आयोजित करण्याचा आमचा निर्धार आहे.

0 Response to "हरदोली येथे सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रमाला भेट दिली :-आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article