स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व अड्याळ पोलीस स्टेशन संयुक्त कारवाईत ट्राली चोरीचे 5 गुन्हे उघड करून 5 आरोपींकडून अकरा लाख 86 हजार रुपये चा गुद्देमाल जप्त
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार)पोलीस स्टेशन लाखनी व अड्याळ परिसरात ट्रॅक्टर ट्रॉली चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत असताना पोलीस अधीक्षक नुरूल हसन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा पोलीस जिल्ह्यात प्रभावीपणे रात्रग्रस्त पेट्रोलिंग राबवून संशयीत इसमांची चौकशी करण्याची मोहीम राबवित आहेत .दिनांक 5 एप्रिल 2025 च्या पहाटे 1 वाजता च्या सुमारास पोलीस स्टेशन अड्याळ परिसरातून 1 ट्राली चोरी गेल्याची बातमी नियंत्रण कक्ष भंडारा येथून प्राप्त झाली. परिसरात पेट्रोलिंग करीत असलेले स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा पोलीस स्टेशन, अड्याळ पोलीस स्टेशन व पोलीस स्टेशन लाखनी चा स्टॉप सर्व रस्त्यांवर नाकाबंदी लावून कोंबिंग सुरू केले असता संशयितरित्या चालत असलेल्या ट्रॅक्टरला थांबवून चालक नामे क्रमांक 1 ) विकल्प विश्वशील टेंभेकर वय 19 वर्ष राहणार धारगाव याची चौकशी केली असता त्याने सदरची ट्रैली मौजा खैरी तालुका पवनी जिल्हा भंडारा येथून चोरली असल्याचे सांगितले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार नामे क्रमांक 2) शंतनु सतीश शेंडे 19 वर्षे राहणार राजेगाव 3 अनिस बागडे वय 22 वर्षे राहणार जवाहर नगर 4)सागर भोजराम वैरागडे क्रमांक 5) विशाल सुभाष बागडे वय 27 वर्षे राहणार नेरी तालुका मोहाडीच्या मदतीने चोरी करून विक्री करण्याकरता मौजा परसोडी येथे लपवून ठेवल्याचे सांगितले. सर्व आरोपींना दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व पोलीस स्टेशन अड्याळ च्या अधिकारी व अंमलदारांनी मौजा चितापूर जवाहर नगर व परसोडी येथून ताब्यात घेतले. पाचही आरोपींकडून एक ट्रॅक्टर ,पाच ट्राली, 2 दुचाकी व 4 मोबाईल असा एकूण 11,66 000 रुपयाचा गुद्देमाल हस्तगत करून पोलीस स्टेशन लाखनी 1,) अप क्रमांक 533/24 कलम 303( 2 ) भा .न्या. स .2) 16/2025 कलम 303 (2) भा.न्या.स. 3)35/ 2025 कलम 303 (2) भा.न्या.स .पोलीस स्टेशन अड्याळ 4)75 / 2025 कलम 303 (2 ) भान्यास 5)81/ 2025 कलम 303( 2) भा .न्या .स असे एकूण पाच गुन्हे उघड करण्यात आले .
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नुरूल हसन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शक स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, अड्याळ येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय पाटील ,पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाळे ,पोलीस उपनिरीक्षक जयराम चव्हाण ,पोलीस हवालदार गेंदलाल खैरे, पोलीस हवालदार प्रदीप डहारे ,सतीश देशमुख ,सावंत कुमार जाधव, सुभाष रहांगडाले, पोलीस शिपाई सचिन देशमुख ,शुभम ठाकरे, सुरज गभणे, कौशिक गजभिये, राजेश निर्वाण यांनी केली असून अधिक तपास पोलीस स्टेशन अड्याळ व लाखनीचे अधिकारी करीत आहेत.
0 Response to "स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व अड्याळ पोलीस स्टेशन संयुक्त कारवाईत ट्राली चोरीचे 5 गुन्हे उघड करून 5 आरोपींकडून अकरा लाख 86 हजार रुपये चा गुद्देमाल जप्त "
एक टिप्पणी भेजें