-->

फ़ॉलोअर

श्रीहरी बालाजी देवस्थान, चिमूर येथे सामूहिक श्री हनुमान चालीसा पठणाचे " 21 मंगळवार " झाल्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

श्रीहरी बालाजी देवस्थान, चिमूर येथे सामूहिक श्री हनुमान चालीसा पठणाचे " 21 मंगळवार " झाल्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  • विविध धार्मिक गतिविधी करिता देवस्थान सर्वोतोपरी सहकार्य करेल - श्री. निलमजी राचलवार
  • जीवनात संगत, सद्गुन व संस्कार महत्वाचे - ह.भ.प.श्री. ओमदेव महाराज चौधरी

प्रतीनिधी. कुलदीप गंधे -->

चिमूर :- क्रांती भूमितील श्रीहरी बालाजी देवस्थान येथे दर मंगळवारला "सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण" कार्यक्रम होत असते. आज दिनांक 22/04/2025, मंगळवार " 21 मंगळवार " झाल्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित श्री. निलमजी राचलवार व मार्गदर्शक म्हणून ह.भ.प.श्री ओमदेव महाराज चौधरी, ह.भ.प.श्री जीवन महाराज थेरे व गुरुकुलातील शिक्षार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले ह.भ.प.श्री ओमदेव महाराज चौधरी यांचा सत्कार श्री. निलमजी राचलवार यांनी केला. 

    या नंतर श्री. निलमजी राचलवार यांनी शुभेच्या पर मार्गदर्शन करीत सांगितले की, विविध धार्मिक गतिविधी करिता देवस्थान सर्वोतोपरी सहकार्य करेल तसेच होणतीही कमतरता कार्यात येणार नाही असे बोलत त्यांनी श्रीहरी बालाजी महाराज भक्त मंडळ यांनी घेत असलेल्या कार्यपरिश्रम बद्दल अभिनंदन करत मंगलमय शुभेच्या दिल्या.

    कार्यक्रमाचे मार्गदर्शक ह.भ.प.श्री ओमदेव महाराज चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, जीवनात संगत, सद्गुन व संस्कार याचे त्यांनी महत्व सांगत या करिता श्री हनुमान चालीसा चे असणारे महत्व व आध्यात्मिक लाभ विषद केले. तसेच हे कार्य सिमित न ठेवता प्रत्येकांनी आपल्या माध्यमातून याचा प्रचार - प्रसार करावा असे सर्वांना आव्हान देत त्यांनी या माध्यमातून कार्यविस्तार व सुसंघटन निर्माण करायचे कार्य आपण सर्व मिळून सेवा रुत्तीने करावे. तसेच देशात चाललेले विविध आघात यावर त्यांनी भाष्य करीत जागृत राहत प्रतिउत्तर देण्याचे सामर्थ आपण निर्माण करावे असे ते मार्गदर्शनात बोलले.

    आज झालेला महाप्रसाद चिमूर येथील प्रतिष्टीत जेष्ठ किराणा व्यापारी श्री. अरुणजी केशवरावजी कठाणे यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आला. त्या निमित्य त्यांचा सत्कार श्री हेमराजजी दांडेकर यांच्या वतीने करण्यात आला. सदर कार्यक्रम हा आज सकाळी निश्चित वेळेत ठीक 8.15 ते 9.15 या कालावधीत संपन्न झाला. या मंगल प्रसंगी सदभाविक उपस्थित होते.

0 Response to "श्रीहरी बालाजी देवस्थान, चिमूर येथे सामूहिक श्री हनुमान चालीसा पठणाचे " 21 मंगळवार " झाल्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article