जननायक लोकगौरव अभय डी रंगारी यांना मानवाधिकार फाउंडेशन (रजिस्टर अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया )चा मानवाधिकार भूषण 2025 पुरस्कार जाहीर
प्रतिनिधी
भंडारा :- मानवतावादी विचारांना आदर्श मानून मानवाधिकाराचे रक्षण ,जतन , संवर्धनासाठी विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो , राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा हा पुरस्कार सामाजिक , शैक्षणिक , राजकीय , व कलेच्या विविध क्षेत्रातील जनसेवेच्या दखलपात्र आणि अविस्मरणीय कार्य पाहून निवड समितीने या वर्षी चा मानवाधिकार भूषण पुरस्कार 2025 साठी , कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव अभय डी रंगारी यांची निवड केली आहे , अभय हे विराट व्यक्तिमत्त्वाचे धनी , कवी , लेखक , मुक्त पत्रकार , समाजसेवक ,प्रभावी वक्ता , समीक्षक , साहित्यिक साहित्यकार , जननायक लोकगौरव , शेतकरी कामगार नेते , राजकीय विश्लेषक , सामाजिक कार्यकर्ते , कुशल संघटक तसेच मानवाधिकाराचे खंदे समर्थक असून , मानवाधिकाराचे रक्षण , जतन ,आणि संवर्धनासाठी आपले आयुष्य खर्ची करत आहेत ,
मौलिक अधिकार देशाचे संविधान देतात मात्र मानवाधिकार हे मनुष्य या नात्याने सर्व माणसांना जन्मताच प्राप्त होतात , मानव अधिकाराचा तात्पर्य मानवासाठी आवश्यक अधिकार असतो , अर्थात मानव अधिकार हे वंश ,लिंग ,राष्ट्रीयत्व , वांशिक , भाषा , धर्म ,किंवा इतर कोणत्याही स्थितीची पर्वा न करता सर्व मानवासाठी जन्मजात हक्क आहेत , त्यात जीवन आणि स्वातंत्र्याचा , गुलामगिरी आणि छळापासून स्वातंत्र्य , मत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य , काम आणि शिक्षणाचा अधिकार आणि बरेच काही समाविष्ट आहेत , यापैकी कोणत्याही अधिकारावर शासन प्रशासन किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती किंवा संस्था ने या अधिकाराचे हनन केले त्या त्या वेळी अभय डी रंगारी यांनी याला पुरजोर विरोध करून मानवाधिकाराचे रक्षण जतन संवर्धन केले आहे , त्यांच्या या अविस्मरणीय आणि ऐतिहासिक कार्याबद्दल मानवाधिकार भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे ,
जनसामान्यांचा असामान्य बुलंद आवाज म्हणून अभय हे परिसरात सुपरिचित आहेत , जनहितार्थ लोकांच्या कोणत्याही समस्या ते कायदेशीर मार्गाने त्वरित सोडवितात , त्यांना या अगोदर राज्य व राष्ट्रीय पातळीवर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले , उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे समाजसेवक पुरस्कार , संभाजी नगर (औरंगाबाद )निवड झाली , महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार , 14 एप्रिल 2025 ला शाहू महाराजांच्या नगरीत कोल्हापूर येते प्रदान करण्यात येणार आहे , मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई तर्फे कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार आणि मालवा ट्रस्ट मुंबई तर्फे गोल्डन पिकाक अवार्ड मिळाले आहेत , दोन कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत ,
त्यांना मानवाधिकार भूषण 2025 हा पुरस्कार रविवार दिनांक 06 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2 वाजता अमृता लॉन , घुलेवाडी रोड ,पुणे नाशिक हायवे ,संगमनेर जिल्हा नगर, महाराष्ट्र राज्य येथे मानवाधिकार फाऊंडेशन च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते वितरित होणार आहे , याबद्दल परिसरातील जनतेने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत
0 Response to "जननायक लोकगौरव अभय डी रंगारी यांना मानवाधिकार फाउंडेशन (रजिस्टर अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया )चा मानवाधिकार भूषण 2025 पुरस्कार जाहीर"
एक टिप्पणी भेजें