बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या मागणीच्या समर्थनार्थ
- नागपूर वरून महामाया बहुउद्देशीय महिला सामाजिक न्याय संघटनेचे पदाधिकारी बोधगया येथे रवाना
संजीव भांबोरे -
नागपूर :- महामाया बहुउद्देशीय महिला सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र चे सर्व पदाधिकारी नागपूर वरून 29 मार्च 2025 ला सकाळी 6 वाजता बोधगया येथे जाण्याकरिता रवाना झालेले आहेत.बोधगया येथे 12 फरवरी 2025 पासून सुरू असलेल्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा या आंदोलनाला समर्थन देण्याकरिता साकोली येथील महामाया बहुउद्देशीय महिला सामाजिक न्याय संघटनेचे पदाधिकारी निघालेले आहेत.
बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, 1949 चा कायदा रद्द करा या मागणीला धरून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात महामाया सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डी .जी .रंगारी, महाराष्ट्राचे अध्यक्ष शितल नागदेवे, उपाध्यक्ष मीनाक्षी वाहने हे नेतृत्व करत असून या प्रसंगी
विदर्भ अध्यक्ष निशा मेश्राम ,कौतुका देशभ्रतार, मालता चौरे , वैशाली देशभ्रतार, तारा डोंगरे ,पंकज वाहने, , प्रतिमा राऊत, कमला रंगारी व इतर सामाजिक न्याय संघटनेचे सर्व पदाधिकारी रवाना झालेले आहेत. यात एकूण 10 महिला व 2 पुरुषांचा सहभाग आहे.
0 Response to " बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या मागणीच्या समर्थनार्थ"
एक टिप्पणी भेजें