तुमसर नगर परिषद शहरी उपजीविका कृती आराखडा समिती ची पहिली सभा संपन्न.
तुमसर प्रतिनिधी :- शासन निर्णय डि.ओ.नं.के- १३०११ व १२.डिसेंबर २०२४ व नगरपरिषद संचालनालय पत्र क्रमांक डीएमए/डीएजेवाय-एस/ क्लॅप/११५२.दिनांक २८ फरवरी २०२५ च्या अनुरूप दीनदयाल जन आजीविका योजना (शहरी) अंतर्गत शहर उपजीविका कृती आराखडा तयार करण्याकरीता सीएलटिएफ समिती गठीत केली.असून नगरपालिका प्रशासन द्वारे शहरातील विविध क्षेत्रातील तळागाळातील निर्धन,वंचित ,सुशिक्षित बेरोजगारांना, कौसल्ये निर्धारित रोजगार विमुक्त,कौसल्य विकासीत महिलांना व शुसक्षीत मुला-मुलींना, दिव्यांग,निराधार वृद्धांना.आश्रय देऊन गरिबी निर्मूलन करून कामगार,सफाई कामगार, तळागळातील लोकांना शहरात कौसल्ये भिमुख करणे आहे. त्याकरिता (कॅम्युनिकेशन ला ऍडमिनिस्ट्रेशन अँड प्रोग्राम) फ्लेक्स टास्क फोर्स शहरी उपजीविका कृती आराखडा समितीची तुमसर नगर परिषदेच्या प्रशासकीय हॉलमध्ये सभा संपन्न झाली सभेचे अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती मा.सुधीर मुंडे साहेब पोलीस निरीक्षक तुमसर हे होते तर तुमसर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे प्रशासकीय कर्मचारी व प्रकल्प अधिकारी श्रीमती यमुताई नागदिवे यांनी सर्व सभासदांचे आभार व्यक्त करून शहरी उपजीविका कृती आराखडा समिती विषयी विशेष मार्गदर्शन केले.सभेतील उपस्थितीत गुलराज कुंदवानी, प्रा. राहुल डोंगरे, अरविंदजी कारेमोरे, रुंदा गायधने, श्रीकृष्ण देशभ्रतार,ज्योती रमेश कावळे,शिल्पा प्रवीण बनसोडे, भंडारा शासकीय कार्यालयीन प्रतिनिधी व तुमसर नगरपरिषद विभागातील प्रशासकीय प्रतिनिधी सभेला हजर होते सभेतील उपस्थितीचें प्रश्नाचे निराकरण करत अल्पोपहार-अंती सभेला पूर्णविराम देण्यात आले.
0 Response to " तुमसर नगर परिषद शहरी उपजीविका कृती आराखडा समिती ची पहिली सभा संपन्न."
एक टिप्पणी भेजें