पत्रकार प्रा. सुरज गोंडाने यांचा वाढदिवस किरण हॉटेल भंडारा येथे उत्साहात साजरा
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार तथा प्राध्यापक सुरज गोंडाने यांचा वाढदिवस किरण हॉटेल भंडारा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी उपस्थित पत्रकारांच्या उपस्थितीत केक कापून व संपूर्ण पत्रकारांच्या उपस्थितीत गुलाबाच्या फुलाचे रोपटे देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमतचे उपसंपादक देवानंद नंदेश्वर, सचिन न्यूजचे वर्तमान पत्राचे मुख्य संपादक सचिन मेश्राम ,महाराष्ट्र लाईव्ह न्युज चे मुख्य संपादक शशिकांत भोयर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे विदर्भ महासचिव प्राध्यापक शेखर बोरकर, लोकमतचे युवराज गोमासे ,पंचम दुधभरीया, सचिन न्यूज चे पत्रकार सुरज निंबार्ते ,सेनपाल वासनिक ,गजभिये यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्व पत्रकारांनी जेवणाचाआस्वाद घेतला.
0 Response to "पत्रकार प्रा. सुरज गोंडाने यांचा वाढदिवस किरण हॉटेल भंडारा येथे उत्साहात साजरा"
एक टिप्पणी भेजें