प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांची रक्तदान शिबिराला भेट
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- दिनांक 18 जानेवारी 2025 ला प्राथमिक आरोग्य केंद पहेला या ठिकाणी दुपारी 1 वाजता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या रक्तदान शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले. या शिबिरात जवळपास 100 युवकांनी रक्तदान कार्यास सहकार्य केले. सदर जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान संस्थेमार्फत भंडारा जिल्ह्यात 4 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत एकूण 22 रक्तदान शिबिर कॅम्प राबविण्यात आले असून त्यामध्ये 2500 रक्त कुटीका जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान मार्फत जमा करण्यात आले असून त्या सर्व रक्त कुटीका जिल्हा सामान्य रुग्णालयत रक्तपेढी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या आहेत. असे महान कार्य सदर संस्थेमार्फत राबविण्यात येत असल्याने सदर संस्थेचे अभिनंदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीससंजीव भांबोरे यांनी केलेले आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक सुभाष आजबले यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच मंगला ठवकर उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी कांबळे प्रशांत बंडूचे आशिष बालपांडे भंडारा जिल्हा युवा अध्यक्ष ,रामटेके साहेब प्राथमिक आरोग्य केंद्र, गोपाल माकडे तालुका अध्यक्ष भंडारा ,श्रीधर वैद्य भंडारा, गुलाब चवळे सेवा केंद्र अध्यक्ष पहेला ,नितेश वंजारी भंडारा जिल्हाध्यक्ष, दिव्यश्री दिपटे ब्लड कॅम्पप्रमुख, श्रीकांत भोयर तालुका पदाधिकारी कमिटी व सेवा केंद्र कमिटी ,पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Response to "प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न "
एक टिप्पणी भेजें