तुमसर येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
तुमसर (तालुका प्रतिनिधी ) : तालुका प्रेस वेलफेअर असोसिएशन पत्रकार संघटनेच्या वतीने मराठी पत्रकरितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती शामाबाई सभागृह तुमसर येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचा सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी व पत्रकारांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन सामूहिक अभिवादन केले. यावेळी प्रमुख उपस्थिती तहसीलदार मोहन टिकले यांचा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन नाना ठवकर तर आभार अशोक हुमने यांनी मानले. यावेळी तालुका प्रेस वेलफेअरचे अध्यक्ष लीलाधर वाडीभस्मे, पत्रकार अमित एच. मेश्राम, सुरेंद्र चिंधालोरे, सीताराम जोशी, नवनीत जोशी, कृष्णा बावनकुळे, संजय बडवाईक,सघंवर्धन देशभ्रतार मराठी व हींदी पत्रकार सघांचे सदस्य उपस्थित होते.
0 Response to " तुमसर येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी"
एक टिप्पणी भेजें