-->

फ़ॉलोअर

वाकडी येथे संजय गरुड महाविद्यालयात जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग विद्यार्थ्यांचा सत्कार व बिस्किट वितरण.

वाकडी येथे संजय गरुड महाविद्यालयात जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग विद्यार्थ्यांचा सत्कार व बिस्किट वितरण.

• अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचा पुढाकार.
जळगाव प्रतिनिधी :-‌ जामनेर तालुक्यातील वाकडी येथील संजय गरुड महाविद्यालयात आज जागतिक अपंग दिनानिमित्त ध्रुव तारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार व राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ *पत्रकार संजीव भांबोरे यांचे मार्गदर्शनात दिव्यांगणा नवी ऊर्जा मिळावी व त्यांचे स्वाभिमान जागृत व्हावे ह्या हेतू पुरस्कार ठेवून ध्रुवत्र अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कडू सिंगारे द्वारा अपंग विद्यार्थ्यांचा व विद्यालयातील शिक्षकांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून बिस्किट वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापिका पी.एन.पाटील व सहाय्यक शिक्षक के.पी.गरुड यांनी दिव्यांगाचे आभार मानून नव चेतनात्मक सहकार्य करण्याची प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक पाटील यांनी केले. तर आभार आर.एस.चौधरी यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्याकरता विजय राजपूत, एकनाथ कोळी, परमेश्वर चौधरी,ममता राजपूत, शब्बीर तडवी, विलास देशमुख, गणेश पाटील ,गणेश सोनवणे, सुधाकर जाधव,ज्योतीताई राजपूत, सुनील जाधव ,यांनी सहकार्य केले.याप्रसंगी शाळेतील सर्व  शिक्षक ,शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.

0 Response to "वाकडी येथे संजय गरुड महाविद्यालयात जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग विद्यार्थ्यांचा सत्कार व बिस्किट वितरण."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article