-->

फ़ॉलोअर

गोंदिया जिल्हयातुन भंडारा मार्गे होणाऱ्या चोरट्या रेती तस्करीचे विरोधात भंडारा पोलीसांची मोठी कारवाई.

गोंदिया जिल्हयातुन भंडारा मार्गे होणाऱ्या चोरट्या रेती तस्करीचे विरोधात भंडारा पोलीसांची मोठी कारवाई.

 

भंडारा जिल्हयात मा. पोलीस अधीक्षक, श्री. नूरुल हसन, भा.पो.से. हे रुजु झाल्यापासुन त्यांनी रेती चोरी, रेतीची अवैद्य वाहतुक करणाऱ्या रेती माफियांच्या विरोधात अत्यंत कडक धोरण अवलंबिल्यामुळे रेती माफियांचे धाबे दणाणले असुन, त्यामुळे भंडारा जिल्हयांतर्गत रेतीचे अवैद्य उत्खनन, चोरी व वाहतुकीवर बऱ्यापैकी अंकुश लागले असतानाच रेती माफियांनी रेतीची तस्करी करण्याकरीता नविन शक्कल लढवुन गोंदिया जिल्हयातुन रेतीची तस्करी भंडारा जिल्हयांतर्गत वेगवेगळया मार्गाने चालु केल्याची माहिती मिळु लागली असताना, मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे मार्गदर्शनात दहशतवाद विरोध पथकाने काढलेल्या माहितीच्या आधारे, घटना दिनांक २५/११/२०२४ चे रात्री ०९:३० वा. दरम्यान तिन टिप्पर मध्ये गोंदिया जिल्हयातुन अवैद्य रेतीची तस्करी भंडारा मार्गे होत असल्याची माहिती मिळाल्याने, दहशतवाद विरोधी पथक तसेच पोलीस स्टेशन, भंडारा येथील अधिकारी आणि अंमलदार यांनी राष्ट्रीय महामार्गावरील नागपुर नाका येथे संयुक्तरित्या सापळा रचुन, चोरटी रेती वाहतुक करणारे एकुण तिन 

टिप्पर :-

१) टिप्पर क्रमांक एम.एच. ४० बी.एल. ३०२७, ज्यामध्ये ९ ब्रास चोरटी रेती बिना रॉयल्टीची, किंमत ४०,०००/- रु. तसेच टिप्परची किंमत ४५,००,०००/- रु.

२) टिप्पर क्रमांक एम.एच. ३६ ए.ए. १२३६, ज्यामध्ये ५ ब्रास चोरटी रेती बिना रॉयल्टीची, किंमत २०,५००/- रु. तसेच टिप्परची किंमत १५,००,०००/- रु.

३) टिप्पर क्रमांक एम.एच. ३६ एफ. ३४३०, ज्यामध्ये ५ ब्रास चोरटी रेती बिना रॉयल्टीची, किंमत २०,५००/- रु. तसेच टिप्परची किंमत १०,००,०००/- रु. असा एकुण १९ ब्रास रेती व तिन्ही टिप्परची किंमत मिळुन ७०,८१,०००/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

तसेच चोरटी रेती वाहतुक करणारे टिप्पर चे चालक/आरोपी नामे १) दिलीप दौलतजी चचाणे, वय ५४ वर्षे, रा. नवेगाव/चाचेर, ता. मौदा, जि. नागपुर, २) कार्तिक रविंद्र वाडीभस्मे, वय २२ वर्षे, रा. बासोरा/गराडा, ता. जि. भंडारा, ३) अभय अरुण कंगाले, वय २३ वर्षे, रा. ऊरागोंदी, ता. जि. भंडारा यांचे विरुद्ध पो. स्टे. भंडारा येथे अपराध क्रमांक ११६१/२०२४ कलम ३०३ (२), ३ (५) भा.न्या.सं. सहकलम ४८(८) महा. जमिन महसुल अधिनियम, १९६६ सहकलम ७, ९ पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ चा गुन्हा दाखल करण्यात आला असुन, तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आणि आरोपीतांची भंडारा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, भंडारा, श्री. नूरुल हसन, भा.पो.से., मा. अपर पोलीस अधीक्षक, भंडारा, श्री. ईश्वर कातकडे, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, भंडारा, श्री. प्रशांत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात, पो.नि. गोकुळ सुर्यवंशी, ठाणेदार, पो. स्टे. भंडारा आणि दहशतवाद विरोधी पथकातील स.पो.नि. गोरक्षनाथ नागलोत, श्रे. पोउपनि चोपकर, स. फौ. कुरंजेकर/३७१, पो.हवा. गभणे/५०३, पो.हवा. तायडे/१११७, पो.अं. खराबे/१४४५, चा.स. फौ. बावनकर/१२१ यांनी केलेली असुन, सदर गुन्हयाचा तपास, वरिष्ठांचे मार्गदर्शनात स.पो.नि. आशिषसिंग ठाकुर, पोलीस स्टेशन, भंडारा हे करीत आहेत.

0 Response to "गोंदिया जिल्हयातुन भंडारा मार्गे होणाऱ्या चोरट्या रेती तस्करीचे विरोधात भंडारा पोलीसांची मोठी कारवाई."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article