युनियन बँक शाखा अधिकारी जामनेर यांची मनमानी
● सीएमईजीपी योजने अंतर्गत लाभार्थी पाच महिन्यापासून मारतोय चक्रा.
● दिव्यंग महिला लाभार्थीशी अभद्र व्यवहार.
● बँक शाखा अधिकारी सरकारी योजनेचा करतोय फज्जा.
● एकाच शाखेत सात वर्षापासून रुजू स्वतःच बनवतो नियम.
● "शासन आपल्या दारी" या कार्यक्रमात प्रमाणित केलेल्या महिलेला करतोय रुपयाची मागणी.
पत्र |
जळगाव प्रतिनिधी :- जामनेर तालुक्यातील युनियन बँक शाखा अधिकारी संदीप पाटील हे सात वर्षापासून एकाच शाखेत राजकीय पाठबळामुळे रुजू असून शाखेतील लाभार्थ्यांची उरमट अभद्र व्यवहार करत असून आपल्याच मनमर्जी ने नियमाचे उल्लंघन व मनमानी करत असतात. असे जनचर्चेचा विषय बनला असून सविस्तर वृत्त असे की केंद्र सरकार मार्फत महाराष्ट्र राज्य सरकार योजने अंतर्गत आत्मनिर्भर भारत विकास योजना सुशिक्षित बेरोजगारांना फायदा मिळावा व बेरोजगार आत्मनिर्भर व्हावा या उद्देशाने "शासन आपल्या दारी" या कार्यक्रमात सी.एम.ई.जी.पी. योजने अंतर्गत वाकडी तालुका जामनेर येथील ज्योती माधव राजपूत ही दिव्यंग महिला कुशल (आत्मनिर्भर) व्यावसायिक असून सदर योजने अंतर्गत आत्मनिर्भर बनण्यासाठी व्यावसायिक ऋण ७ लाख ५० हजार मंजूर केले. परंतु शाखा अधिकारी संदीप पाटील हे ज्योती माधव राजपूत ह्या महिलेला पाच महिन्यापासून आत्मनिर्भर ऋणसाठी टाळा-टाळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. सायंकाळी सहा वाजेपर्यंत शाखेत बसून ठेवत असतात. हतबल होऊन महिलेने विचारले असता,"अनेक लोकांचे कामे पेंडिंग आहेत त्यांचे मला पहिल्यांदा ऋण कामे करावे लागतो, तू चार दिवसांनी ये!..” महिला निर-उत्तर राहिली. शासनाचे नियमाचा पालन करुन. महिलेने पुन्हा शाखेत बैकं मॅनेजरला विचारले असता. "तुम्ही दिलेल्या कोटेशन खातेवर मी आर.टी.जी.एस. मारले आहे. दोन दिवसात तुमच्या ऋणचे रुपये दिलेल्या खात्यात जमा होतील” पण रुपये जमा न झाल्याने नंतर विचारले असता "तुमच्या कामात कोणीतरी पिन मारली आहे,चार दिवस लागतील पिन काढायला" सदर महिला चार दिवसांनी बँकेत गेली असता .म्हणाले "तुमचे कोटेशन बरोबर नाही" मागनी केली तेव्हा वेगवेगळे चार दा कोटेशन दिले. त्यांनी नकार दिला व लाभार्थी महिले सोबत अभद्र व्यवहार करून ५० हजार रुपयाची मागणी करू लागला. नाही तर मी तुला आत्मनिर्भर सरकारी योजने अंतर्गत ऋण देत नाही व तुझा सुद्धा अधिकार नाही. “हे सरकारी योजनेचे रुपये आहेत, त्या साठी तुला ५० हजार रुपये मोजावे लागेल नाही तर तुझा केस परत करु!” अशी धमकी दिली.असे अनेक कारण दर्शवत सदर दिव्यंगमहिलेला हतबल व मानसिक त्रास देण्याचा शाखा अधिकारी प्रयत्न करत आहेत. अशीच बाब अधिकाऱ्याच्या निदर्शनात होती तर सदर अपंग महिलेच्या आत्मनिर्भर व्यवसाय विषयी निरक्षण केले कसे? वारंवार कोटेशन मागितले कसे? व्यावसायिक खाते उघडून ४० हजार रुपये जमा करायला लावले कसे? जिल्हास्तरावर "शासन आपल्या दारी" कार्यक्रमात जिल्हा अधिकाऱ्यांचे हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले कसे? असे अनेक प्रश्न उपस्थित करत अशाच प्रकारे शाखा अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करत सामान्य जनता,खातेदार, दिव्यंग,महिला,लाभार्थ्यांना आत्मनिर्भर अनेक सरकारी योजनेचा स्थानिक स्तरावर फायदा होत नसेल,तर अशा अधिकाऱ्यांचा का उपयोग? असा प्रश्नचिन्ह असून सदर दिव्यंग महिलेस शासन स्तरावर सी.एम.इ.जी.पी. योजने अंतर्गत आत्मनिर्भर कौशल्य व्यावसायिक ऋण साठी मागणी व शाखा अधिकारी यांची तक्रार शासन स्तरावर केली असून जळगाव जिल्ह्यात जन चर्चेच्या विषय बनला आहे.
0 Response to " युनियन बँक शाखा अधिकारी जामनेर यांची मनमानी"
एक टिप्पणी भेजें