-->

फ़ॉलोअर

 नागपूर येथील अध्यापक भवन येथे  संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ  समितीची सभा संपन्न

नागपूर येथील अध्यापक भवन येथे संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ समितीची सभा संपन्न

नागपूर (संजीव भांबोरे ) :- दि. 15 सप्टेंबर 2024 रोजी नागपूर येथील शेतकरी भवनांच्या बाजूला असलेल्या अध्यापक भवनांमध्ये संयुक्त रिपब्लिकन आघाडी नागपूर आणि एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा यांच्या वतीने एका सभेचे आयोजन करण्यात आलेले होते .या सभेचे अध्यक्षस्थानी आयुष्यमान दुर्वास चौधरी होते .आणि या सभेमध्ये रिपब्लिकन नेते जे गटबाजीत विभागले गेलेले आहेत या सर्व रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आणि आंबेडकरी समुदायातल्या ज्या विविध संघटना कार्यरत आहेत त्या सर्व संघटनांना एकत्र आणणे हा उद्देश ठेवून समाजाला एक एकत्रितपणे संघटन उभे करण्याचा विचार या माध्यमातून करण्यात आला .आणि समाजाचं जे नेतृत्व आहे हे नेतृत्व प्रभावीपणे उभं झालं पाहिजे हा विषय घेऊन ही सभा आयोजित करण्यात आली .

            त्यांशिवायही  समाज किती महत्त्वाचा आहे हे गृहीत धरून नेत्यांशिवाय समाज या संकल्पनेला पुढे आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. या सभेमध्ये संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ असे नाव देण्यात आले . ज्या दोन समित्या कार्यरत असणाऱ्या भंडारा आणि नागपूर मधल्या या दोन्ही समित्या एकत्र येऊन संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ असे नामकरण करण्यात आले .आणि येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये जे कोणी इच्छुक उमेदवार असतील या उमेदवारांची चाचपणी करण्यात येईल आणि या संघटनेची बांधणी एकसूत्र पद्धतीने करण्याचा विचार या सभेमध्ये व्यक्त करण्यात आला. उत्तर नागपूर आणि भंडारा या दोन विधानसभा क्षेत्रामध्ये दोन उमेदवार देण्याचा विचार करण्यात आला .आणि जे कोणी उमेदवार विदर्भामध्ये वेगवेगळ्या मतदार संघामध्ये इच्छुक असतील त्यांची चाचणी करण्यात येऊन कोर कमिटीच्या समोर त्यांचे अर्ज घेऊन त्यावर मग ही संघटना विचार करेल. विविध 

         आंबेडकरी संघटना समाजाचं कुटुंब आहे या विभक्त झालेल्या आंबेडकरी समुदायाला या संघटनेच्या माध्यमातून एकत्र आणण्यासाठी हा एक नवा प्रयोग करण्याचा उद्देश या संघटनेने केलेला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केले.‌कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश खोब्रागडे यांनी केले .आभार कैलास बोंबडे यांनी मानले. सभेला  अमृत बनसोड ,,रोशन जी जांभुळकर ,चंद्रशेखर टेंभुर्ण  दिलीप वानखेडे, संजीव भांबोरे ,रामटेके राजेश मडामे ,प्राध्यापक प्रदीप बोरकर ,सहदेव गोडबोले ,ओमप्रकाश सोनकुसरे ,दिनेश डोके, सुनील इलमकर ,दिलीप लांडगे ,दिनेश गोडघाटे, दुर्वास चौधरी, रेश्मा भोयर ,पद्माकर गणवीर, कैलास बोंबाडे ,गीता कवाडे ,मनीष गाणार ,हिरालाल मेश्राम, आणि मोठ्या संख्येने कार्यकर्तागं उपस्थित होते .

0 Response to " नागपूर येथील अध्यापक भवन येथे संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ समितीची सभा संपन्न"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article