-->

फ़ॉलोअर

 शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक करून दंडात्मक कारवाई करावी शिवजन्मोत्सव समिती व ग्रामस्थांची मागणी

शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक करून दंडात्मक कारवाई करावी शिवजन्मोत्सव समिती व ग्रामस्थांची मागणी

● मुख्यमंत्री ,गृहमंत्री, यांना अड्याळ ठाणेदारा मार्फत निवेदन साद

 


संजीव भांबोरे 

भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजा मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील हिंदवी स्वराज्याचे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागील आठ महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या ब्रांझ धातूचा पुतळा कोसळून तुकडे तुकडे झाल्यामुळे सुमार दर्जाचा शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन शिवजन्मोत्सव सोहळा समिती तथा समस्त ग्रामवासी अड्याळ यांच्या वतीने ठाणेदार धनंजय पाटील यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी निवेदन देण्यात आले. याबाबतीत सविस्तर वृत्त असे की ,कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर लोकसभा निवडणूक 2024 च्या चार महिन्यापूर्वी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या पुढाकाराने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .उद्घाटनाप्रसंगी देशाचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस केंद्र व राज्याचे अन्य मंत्री, अधिकारी उपस्थित होते .परंतु मागील आठ महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा दिनांक 26/8 /2024 ला कोसळला. पुतळा ब्रांझ धातूचा असून पूर्णपणे पोकळ होता .त्या पुतळ्याची असंख्य तुकडे तुकडे पडले. पुतळा बनविणारा जयदीप आपटे वय 24 वर्षे याला अनुभव नसताना टेंडर देण्यात आला .सदर पुतळ्याचे टेंडर 35 कोटी रुपयात देण्यात आले. तो पूर्णपणे पोकळ होता या प्रकरणात जे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर दोशी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळणे ही संताप जनक आहे. सदर घटना अत्यंत वेदनादायक आहे .करिता वरील कॉन्ट्रॅक्ट दारावर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन उपपोलीस निरीक्षक हेमराज सोरते यांच्यामार्फत देण्यात आले .निवेदन देताना मयूर कोल्हटकर संयोजक शिव जन्मोत्सव समिती, मुनेश्वर बोदलकर माजी सरपंच तथा माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष, नितीन वरंटीवार माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष ,साहिल शेख ,कमलेश जाधव, अक्षय गिरडकर, विश्वास उंदीरवाडे ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते..

0 Response to " शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक करून दंडात्मक कारवाई करावी शिवजन्मोत्सव समिती व ग्रामस्थांची मागणी"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article