-->

फ़ॉलोअर

 गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची प्रलंबित मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची प्रलंबित मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न

संजीव भांबोरे 

भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या संदर्भात आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोज सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते,भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार डॉ प्रशांत पडोळे ,भंडारा पवनी विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर ,  यांच्या  प्रमुख उपस्थितीत प्रकल्पग्रस्तांची बैठक घेण्यात आली .या बैठकीमध्ये खापरी व नेरला आणि इतर पुनर्वसित गावे व अंशतः बाधित यांच्या समस्येवर चर्चा करण्यात आली. खापरी येथील 261 कुटुंब संख्या ची लिस्ट ग्रामपंचायत मध्ये सादर करण्यात यावी असे सूचना करण्यात आलेले आहेत. 18 नागरी सुविधा अभाव पूर्ण करण्यात यावी ,प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित भूखंड वाटप करण्यात यावे ,2 लाख 90 लक्ष रुपये वाढीव मोबदला देण्यात यावा ,प्रकल्पग्रस्त बाकी शेतकऱ्यांना पण 2लक्ष 90 हजार वाढीव मोबदला प्रकल्पग्रस्त म्हणून देण्यात यावा, शासनाने बंद केलेल्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जीआर अनुसार प्रमाणपत्र पुन्हा देण्यात यावे, खापरी व नेरला या गावाचे 20 दिवसांमध्ये संपूर्ण सर्वे करून भूखंडाची जागा नेमणूक करून त्यांच्या मार्ग मोकळा करण्यात यावा ,पुनर्वसित झालेले संपूर्ण 34 गावांची सीमांकन नेमणूक करावी ,स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना करून महसुली दर्जा प्राप्त करून देण्यात यावा, उदाहरण पेंढरी, जामगाव ,ओळख टाकळी, अंशतः बाधित असलेले 32 गावे मधून 22 गावांचे शासनाकडे ऐच्छिक पुनर्वसन करिता प्रस्ताव पाठवण्यात आलेली आहेत ,उमरेड करांडला अभयारण्य व्याघ्र प्रकल्पामध्ये 8 गावे पुनर्वसनाकरता समाविष्ट असून तात्काळ त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, सदर बैठकीला भंडारा जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते,भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोळे , पुनर्वसन विभागाचे सोनवणे , एचडीओ बालपांडे  , पवनी येथील तहसीलदार  गरुड , संबंधित सर्व विभागाची अधिकारी ,कर्मचारी व प्रकल्पग्रस्त मध्ये बाळू फुलबांधे, निर्णय येथील सरपंच छायाताई बारेकर, संजय तळेकर, खापरी सरपंच रेखाताई रेहपाडे ,मंगेश वंजारी ,भाऊ कातोरे ,दीपक पाल, अतुल राघोर्ते  प्रमिलाताई शहारे अर्जुनी पुनर्वसन सरपंच चेतन राघोर्ते, उपसरपंच रामटेके व प्रकल्पग्रस्त गावातील प्रकल्पग्रस्त यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

0 Response to " गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची प्रलंबित मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article