आम आदमी पार्टी द्वारे तुमसरात शिंदे सरकाचा घोषणा देत विरोध
तुमसर प्रतिनिधी :- तुमसर शहर राईस सिटी येथील मोठा बाजार चौक भंडारा जिल्हयाचे महासचिव उज्वल सहारे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते च्या वतीने, भ्रष्टाचारी शिंदे सरकार च्या विरोधात घोषणा देऊन या घटनेच्या निषेध करण्यात आले. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शेजारी राजकोट येथे समुद्रकिनाऱ्याजवळ नौदल दिनानिमित्त दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल विभागाने राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्ण कृती पुतळा सुमारे 43 फूट उंच (15 फूट चबुतरा आणि 28 फूट उंचीचा पुतळा) उभारला अर्थातच नेहमीप्रमाणे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि शिवसेनेचे श्री एकनाथजी शिंदे माननीय मुख्यमंत्री तसेच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राज्यपाल रमेश भैस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत याचे अनावरण करण्यात आले शिवरायांनी मालवणच्या समुद्रात बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला अजून अध्यायावत असून भारत सरकार च्या नौदलाने सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला ही देशासाठी चिंतेची बाब आहे या घटनेचा आम आदमी पक्ष राज्यव्यापी निषेध व्यक्त करत असून ह्या घटनेने करोडो देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस यांची डबल इंजिन सरकार मध्ये भ्रष्टाचार किती प्रमाणात वाढला आहे हे यावरून दिसून येते नुकताच गाजावाजा करून केलेल्य वास्तु मग त्या संसद भवन असो की राम मंदिरअसो या सरकारकडून लोकांच्या पैशांची नुसती उधळपट्टी होत असल्याचे यावरून दिसून येत होते.
सरकारच्या विरोधात घोषणा विरोध प्रदर्शन करण्यात आले. त्यावेळी शेखर नेवारे तुमसर तालुका उपाध्यक्ष, प्रमोद राऊत,सचिन नागदेवे, शेषराव सोनकुसरे,जयपाल बोंबर्डे ,योगेश ऊके ,पंकज मेश्राम, संदेश माटे,आशिष तिवडे ,प्रवीण भाऊ,अजय भाऊसागर,छोटू साखरवाडे,सेवकराम सोनकुसरे.इतर शेकडो शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Response to " आम आदमी पार्टी द्वारे तुमसरात शिंदे सरकाचा घोषणा देत विरोध "
एक टिप्पणी भेजें