-->

फ़ॉलोअर

एक विशेष सहल फक्त त्यांच्या साठी पहिल्यांदा नागपुरातून

एक विशेष सहल फक्त त्यांच्या साठी पहिल्यांदा नागपुरातून

एक कदम सक्षम भारत की और

नागपूर :-  भिकारी मुक्त भारत ही सामाजिक संघटना आहे, जी देशात सर्वत्र कार्यरत आहे.  या अभियानामार्फत असाह्य,अनाथ, भिक्षेकरी, स्त्री,पुरुष, स्थलांतरित मजूर, बालक यांच्या साठी विशेष  कार्य करते यांचे पुनर्वसन, आरोग्य, चिंतन, प्रबोधन,  सहल,शिक्षण,रोजगार असे अनेक कार्यक्रम राबविते. यांचाच एक भाग एक पाऊल सक्षम भारतासाठी ह्या वाक्यानुसार  नागपूर शहरातील आस्था, आणि आदर्श बेगर हाऊस मधील मंडळींना एक सहल घेऊन जात आहो. ज्या मुलांनी आपल्या आई वडिलांना रस्त्यावर सोडून दिले  अशी  मंडळी येथे आहे त्यांचा आधार होणे आणि त्या मुलांना  समुपदेशन करणे यासाठी.

   मी स्वाभिमानी आहो वेळ साथ देत नाही नाहीतर मी ही तुमच्या बरोबरीने उभे असतो,, नागपूर येथील  आस्था व आधार बेगर हाऊस, येथील 60 ते 65 वर्षांच्या  45 मंडळींना  मोकळा श्वास घेता यावा या दृष्टिकोनातून व आज ते आहे ही भावना त्यांच्या मनातून काढून  त्यांना जीवनातील नवीन चेतना मिळावी, एक विशेष मनोरंजन व्हावे या दृष्टीने  दिनांक 8 सप्टेंबर 2024 ला सकाळी 9: 30 वाजता छत्रपती  चौक नागपूर येथून  निघाली रामधन  रामटेक तिर्थस्थळी गेली .

         या  यात्रेला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी खालील मान्यवर उपस्थित राहणार आहे. 

पद्मश्री डॉ. विकासजी महात्मे

माजी खासदार राज्यसभा भारत सरकार, 

 श्री राजू मिश्रा

 जेष्ठ नागरिक प्रतिष्ठाननागपूर 

 माननीय मतीन भोसले 

   सामाजिक कार्यकर्ते व संचालक प्रश्नचिन्ह आश्रमशाळा अमरावती,

मा.सुनील कुमार मांडवे  

राष्ट्रीय संयोजक ,भिकारी मुक्त भारत नवी दिल्ली

श्रीमती प्रतिभाताई कुमरे

 राष्ट्रीय संघटन महामंत्री 

   भिकारी मुक्त भारत

                                    नवी दिल्ली डॉ.राखी खेडेकर जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान  यांनी हिरवी झेंडी देऊन बस ला रवाना केले. 

        रामधन येथे सर्वांचे स्वागत भव्य दिव्य श्री चंद्रपाल चौकसे संचालक रामधाम रामटेक यांनी केले , संजय पवार रोहित ढवळे, रूपा बोरीकर स्वागता साठी सज्ज होता. 

       रामधाम  मध्ये त्यांना सर्वात पहिले  दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर त्यांना  भोजनाचा स्वाद घेतला, अनेक परिसरात त्यांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले, त्यांना जादूचा खेळ ही दाखविण्यात आले.उद्योग कसे केले जातात याची माहिती त्यांना देण्यात आले. त्यांच्या सोबत चर्चा त्यांचे मनोगत सर्वांनी ऐकून घेतले आनंद आणि खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांनी विशेष आनंद घेतला चहापान घेऊन रामधाम चा निरोप घेत नागपूर कडे परतले.

      या संपूर्ण नियोजना साठी श्री गोडबोले सर, मुकुंद अडेवार मिथुन चौधरी,आरती लोखंडे, स्वाती नारळवार।  गौतम नागरे,श्रीमती नीलिमा,महेश येडेयांनी वेवस्था केली.

0 Response to "एक विशेष सहल फक्त त्यांच्या साठी पहिल्यांदा नागपुरातून"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article