-->

फ़ॉलोअर

भंडारा जिल्ह्यातून 100 एसटी बसेस पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेकरता वर्ध्याला दिनांक 19 तारखेला जाणार

भंडारा जिल्ह्यातून 100 एसटी बसेस पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेकरता वर्ध्याला दिनांक 19 तारखेला जाणार

● शाळेतील विद्यार्थी ,सर्वसामान्य प्रवासी व नोकरी करणाऱ्यांची उडणार तारांबळ

● बस स्थानक प्रमुख भंडारा विजय गिदमारे यांच्याशी  जनता की आवाज चे प्रतिनिधी संजीव भांबोरे यांनी घेतली भेट

संजीव भांबोरे

भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी वर्धा जिल्हा दौरा कार्यक्रमाच्या अनुषंगाने 100 एसटी बसेस भंडारा जिल्ह्यातून विशेष बस सेवा भंडारा विभागाला उपलब्ध करून देण्याबाबत नुकतेच पत्र प्रसिद्ध मिळाले आहे. त्या कार्यक्रमाकरिता दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी वर्धा येथे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या दौरा निश्चित झाला असून विविध योजनांचे लाभार्थी यांची कार्यक्रम एसटी बसेसने ने -आन करण्याकरता अहवाल जिल्हाधिकारी वर्धा यांचेकडून विशेष बस सेवेअंतर्गत भंडारा विभागातील 100 बसेस वर्धा येथे उपलब्ध करून देण्यात यावे असे पत्र नुकतेच विभागाला मिळालेले आहे .त्या अनुषंगाने वरील नियोजनानुसार वर्धा जिल्ह्यात भंडारा विभागातील 19 सप्टेंबर 2024 पासून ते 21 सप्टेंबर 2024 पर्यंत सर्व बसेस विभाग नियंत्रक यांच्याकडे राहतील. भंडारा विभागात 350 राज्य परिवहनच्या बसेस उपलब्ध आहेत ही जनसामान्याची लाल परी असून प्रत्येक गाव खेड्यातील लोक भंडारा येथे ये जा करीत राहतात परंतु लोकांचे जीवनावश्यक गरज लक्षात न घेता माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या कार्यक्रमाकरिता विशेष व सेवा अंतर्गत भंडारा विभागातील 100 बसेस दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोज शुक्रवारला वर्धा येथे पाठविण्यात येणार आहेत त्यामुळे दिनांक 19 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर पर्यंत भंडारा जिल्ह्यात उपस्थित चा तुटवडा निर्माण होईल त्यामुळे प्रवासी जनता तसेच विविध ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी विद्यार्थी हे लोक एसटी विभागाला मासिक आगाऊ रक्कम राज्य परिवहन बसेसच्या पासेस विकत घेतात परंतु 19 20 21 सप्टेंबर या तिन्ही दिवशी बसेसच्या तुटवडा निर्माण झाल्याने विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचू शकणार नाही त्याचप्रमाणे इतर विभागात कर्मचारी गोरगरीब लोक कामाच्या निमित्ताने भंडारा शहरात कामानिमित्त येत असतात ते वेळेवर पोहोचू शकणार नाही मग झालेल्या या दिरंगाईमुळे जबाबदार कोण राहणार असा प्रश्न जनतेला निर्माण होतो किंवा या तीन दिवसात एसटी बसेस  उपलब्ध न झाल्यास विद्यार्थी शाळेत वेळेवर न पोहोचल्यास त्यांच्या तीन दिवसांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे आणि आगाऊ रक्कम जीएसटी विभागाला दिली ती येण्या-जाण्याचा भाडा एसटी महामंडळ परत देईल काय असा संताप सुद्धा विद्यार्थी व पालक करीत आहेत. 19 20 21 सप्टेंबर या तीन दिवस होणाऱ्या गैरसोई मुळे विद्यार्थी कर्मचारी सर्वसामान्य नागरिक यांना स्वतःची व्यवस्था वेळप्रसंगी स्वतः करावी लागेल. व यांनी एसटी महामंडळाला मासिक पावसाची आगाऊ रक्कम भरून सुद्धा अशा प्रकारे तीन दिवस त्रास होत असेल तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार तर त्यांची भरपाई कोण देणार ?असा संसप्त सवाल विद्यार्थी त्याचप्रमाणे पालक सुद्धा करीत आहेत. याबाबतीत भंडारा बस स्थानकचे प्रमुख विजय गिदमारे यांच्याशी जनता की आवाज चे प्रतिनिधी संजीव भांबोरे यांनी प्रत्यक्ष दिनांक 15 सप्टेंबर 2024 ला संपर्क केला असता वरून आम्हाला आदेश असल्यामुळे आम्ही याबाबतीत काहीच करू शकत नसल्याचे आपली प्रतिक्रिया व्यक्ती केली.

0 Response to "भंडारा जिल्ह्यातून 100 एसटी बसेस पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेकरता वर्ध्याला दिनांक 19 तारखेला जाणार"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article