लोककलावंत सांस्कृतिक कला मंचच्या जिल्हाध्यक्षपदी सुप्रसिद्ध गायक महेंद्र सावंग यांची निवड
बुलढाणा (जि. प्र.) :- महाराष्ट्रातील लोककलावंत, शाहिर व कलावंत यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना लोककलावंत सांस्कृतिक कला मंच च्या बुलडाणा (उत्तर) जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक, सिने अभिनेते तथा साप्ता. धम्मक्रांती चे संपादक आयु. महेंद्रभाऊ सावंग यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड ही महेंद्रभाऊ सावंग हे करत असलेल्या धम्मकार्य, लोककलावंत व शाहीर, कलावंतांच्या न्याय हक्क आदी कार्याची दखल घेवून लोककलावंत सांस्कृतिक कला मंच चे प्रदेशाध्यक्ष प्रसिद्ध गायक विष्णू शिंदे व प्रदेश उपाध्यक्ष शाहीर डि आर इंगळे यांनी केली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन हिवराळे, गायक विलास धुरंधर, ढोलक वादक राहुल हिवराळे आदी उपस्थित होते.
0 Response to "लोककलावंत सांस्कृतिक कला मंचच्या जिल्हाध्यक्षपदी सुप्रसिद्ध गायक महेंद्र सावंग यांची निवड "
एक टिप्पणी भेजें