नागपूर ते उमरेड मुख्य मार्गावरील खापरी ते सुरगाव फाट्यावर तीन तास रास्ता रोको आंदोलन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांचे आश्वासन नंतर मागे
प्रकरण सुरगाव येथे कत्तलखाना सुरू करण्याकरिता प्रशासनाने दिलेली जागा तात्काळ रद्द करावी
नागपूर (संजीव भांबोरे) :- जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सुरगाव गावाच्या हद्दीत जिल्हा प्रशासनाने कत्तलखाना सुरू करण्याकरता दिलेली जागेची मंजुरी तात्काळ रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणी करिता वारकरी पंथ व परिसरातील गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 1 जुलै 2024 ला उमरेड ते नागपूर मुख्य महामार्गावरील खापरी ते सुरगाव या फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे.हा मोर्चा सुरगाव गावातून निघून पाच किलोमीटर अंतरावर चालून खापरी ते सुरगांव चौकात या मोर्चाचे चक्काजाम आंदोलन मध्ये रूपांतर झाले. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला. पावणे बारा वाजेपासून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली. जोपर्यंत जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आंदोलन स्थळी येणार नाही व दिलेली जागा जोपर्यंत रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी जाहीर केले शेवटी उपविभागीय महसूल अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्या विद्यासागर चव्हाण लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घ्यावे लागले. यावेळी मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या . सदर मोर्चाचे नेतृत्व ओमदेव महाराज चौधरी, सरपंच सुरेखा गाडबैले ,विशाल पडोळे शंकर महाराज कावळे, दामू महाराज फाये, कैलास महाराज ,संजय एकापुरे, कुलदीप गंधे ,अमित शिवणकर, विशाल चिंचकर ,राहुल खोंडे, अतुल धावळे स्वप्निल चौरे विजय शहारे ,सुरज महाराज, लोकेश महाराज कडव, दिनेश महाराज मोहतुरे ,महाराज रेवतकर, पंकज महाराज मुंगले ,कार्तिक महाराज इंगळे, चेतन महाराज शिल्लेपार ,आकाश भाऊ पडोळे, नंदकिशोर चुधरी,असंख्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
0 Response to "नागपूर ते उमरेड मुख्य मार्गावरील खापरी ते सुरगाव फाट्यावर तीन तास रास्ता रोको आंदोलन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांचे आश्वासन नंतर मागे"
एक टिप्पणी भेजें