तुमसरात प्रीपेड स्मार्ट मीटरला विरोध
● आमआदमी पक्षातर्फे निवेदन
तुमसर : महावितरणने शहरासह जिल्ह्यात वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू केली असून ही प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी. स्मार्ट वीज मीटर योजनेचा निषेध करत आम आदमी पक्ष तुमसर तर्फे महावितरणच्या उपविभागीय अभियंता व तहसिलदार यांना निवेदन दिले.
निवेदनात आम आदमी पक्षाने नमूद केले की तुमसर शहरासह भंडारा जिल्ह्यात वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सर्व्हे करण्यात येत आहे. वास्तविक वीज मीटर निवडीबाबत वीज कायदा २००३ कलम ५५ नुसार ग्राहकांना स्वातंत्र आहे. मात्र वीज वितरण कंपनी कडून स्मार्ट वीज मीटर लावण्यासाठी ग्राहकांच्या घरोघरी सर्व्हे करण्यात येत असून स्मार्ट मीटर लावणे एकप्रकारे बंधनकारकच असल्याचे चित्र निर्माण केले जात असून महावितरण तर्फे ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम करत असून हे अन्यायकारक आहे.
भंडारा जिल्ह्यातील बहुतांश वर्ग हा ग्रामीण भागात राहत असून आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे प्रीपेड मिटर लावल्यास आधी पैसे भरावे लागणार आहे आणि पैसे भरून वीज वापरण्याची क्षमता वीज ग्राहकांमध्ये नाही. तसेच ऐनवेळी रिचार्ज संपल्यास तोही वेळेतच करण्याची आर्थिक परिस्थिती नाही अशी वास्तविकता जिल्ह्यातील वीज ग्राहकांची आहे, ती सर्वश्रुत आहे. अन्न, वस्त्र, निवाराववीज मानवी जीवनातीलया चार मूलभूत गरजा आहेत. मात्र याच मूलभूत गरजांच्या बाबतीत शासन उदासीन दिसत आहे. एकंदरीत प्रीपेड स्मार्ट मीटर योजना ही सर्व सामान्य नागरिकावर अन्याय करणारी असून तात्काळ प्रभावाने ही प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा महासचिव उज्वल शहारे, तालुका अध्यक्ष राजकुमार उखरे, तालुका शहर अध्यक्ष सोनलाल भुरे, तालुका सचिव प्रमोद राऊत, तालुका उपाध्यक्ष संजय चौधरी, पंकज मेश्राम, मिताराम उईके, बापू गौरकर, सचिन नागदेवे, आकाश मेश्राम, प्रकाश लांजेवार, संदेश माटे, अभिषेक लांजेवार, अजय रगडे, युवराज आगासे, फिरोज शेख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
0 Response to "तुमसरात प्रीपेड स्मार्ट मीटरला विरोध"
एक टिप्पणी भेजें