प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे व राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी साप्ता."जनता की आवाज" वृत्तपत्र कार्यालय कुबेर नगरी तुमसर येथे दिली भेट
तुमसर :- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचेे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे व राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी साप्ता." जनता की आवाज" या वृत्तपत्र कार्यालय कुबेर नगरी तुमसर शहर येथे भेट दिली असता, साप्ता."जनता की आवाज"चे मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत भंडारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी,सुशिक्षित बेरोजगार वरील आळा,कृषी क्षेत्र व कायदे,अपंग विषयी समस्या, राजकीय क्षेत्रात (दलितांना)बौद्धानां महाराष्ट्रात स्थान का?.नाही! असे अनेक विविध समस्यावर चर्चा करून, संपादक व पत्रकार कोणत्याही दबंगशाहीला न जुमानता लोकहिताचे प्रश्न समजून सामाजिक उत्थानाची प्रेरणा ठेवून शासन दरबारी प्रश्न मांडायला हवा!.हीच खरी लेखणीची संपादक पत्रकाराची गरज आहे.असे भाकीत करून साप्ता."जनता की आवाज" ला शुभेच्छा देत,वृत्तपत्राचे तंत्र सहाय्यक हर्षवर्धन देशभ्रतार यांना भेट देत फराळ घेऊन मार्ग परतीचा घेतला.
0 Response to " प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे व राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी साप्ता."जनता की आवाज" वृत्तपत्र कार्यालय कुबेर नगरी तुमसर येथे दिली भेट"
एक टिप्पणी भेजें