-->

फ़ॉलोअर

 विविध गटात विखुरलेल्या आंबेडकरी पक्षांना एकत्रित आणण्यासंबंधी चर्चा बैठकीचे आयोजन

विविध गटात विखुरलेल्या आंबेडकरी पक्षांना एकत्रित आणण्यासंबंधी चर्चा बैठकीचे आयोजन


संजीव भांबोरे  

भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- आपणास विनंती आहे की, राज्यात आंबेडकरी विचारांच्या अनेक संघटना आहेत. ज्या लोकसभा, विधानसभा व जि. प सारख्या निवडणुका लढवीत असतात. मात्र ह्या सर्व संघटना एक संघ नसल्याने आंबेडकरी विचाराचा खरा प्रतिनिधी संसदेत, विधानसभेत किंवा जि .प सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आपला प्रतिनिधी निवडून पाठवू शकत नाही.

                राज्यातील आंबेडकरी चळवळी एक संघ नसल्याने, व विविध संघटने कडून उमेदवार उभे केल्याने, कोणताच आंबेडकरी चळवळीचा उमेदवार निवडून येणार नाही असा समज आंबेडकरी जनतेत निर्माण होत असल्याने, व त्याचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी, त्याला पाडू शकणाऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याकरिता आंबेडकरी समाज एक संघ होऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षाला नाईलाजाने मतदान करीत असतो. ही वस्तुस्थिती आहे. 

                असेच होत राहिले तर, पुढे आंबेडकरी चळवळ संपून जाण्याचा धोका आहे. म्हणून आंबेडकरी चळवळीला जिवंत ठेवण्यासाठी राज्यातील सर्व आंबेडकरी गटांना एकत्रित आणणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. 

         आपण ह्या सर्व गटांना एकत्रित आणण्याच्या दृष्टीने विचार विमर्स करण्यासाठी दिनांक.15/06/2024 रोज शनिवारला शासकीय विश्रामगृह भंडारा येथे दुपारी 12=00 वाजता विविध ंबेडकरी गटातील पुढार्‍यांची बैठक आयोजित केली आहे. तरी विविध आंबेडकरी गटातील पुढारी, तसेच विविध राजकीय पक्षात काम करणाऱ्या आं बेडकरी पुढार्‍यांनी सदर बैठकीत उपस्थित राहुल मार्गदर्शन करावे. असे आवाहन  चंद्रशेखर टेंभुर्णे, अमृतजी बनसोड, रोशन जांभुळकर, परमानंद मेश्राम, आसित बागडे, इंजि. रूपचंद रामटेके, कैलास गेडाम, प्रा. अनिल कानेकर, तुळशीदास गेडाम, हिवराज उके, डॉ. सुरेश खोब्रागडे, अरविंद रामटेके, प्रा. रमेश जांगडे, ग्यानचंद जांभुळकर, विलास मेश्राम, दिलीप वानखेडे, धनपाल गडपायले, संदीप मोटघरे, सूर्यभान हुमणे, मदनलाल गोस्वामी, सुरेंद्र बनसोड, बबन गजभिये, संजीव भांबोरे यांनी केलेले आहे.

0 Response to " विविध गटात विखुरलेल्या आंबेडकरी पक्षांना एकत्रित आणण्यासंबंधी चर्चा बैठकीचे आयोजन "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article