अंभोरा पुलियावर बनलेल्या गॅलरी ऑफ वाटर रेस्टॉरंटला राज्यसरचिटणीस संजीव भांबोरे यांनी दिली भेट
व्यवस्थापक विनोद वंजारी व दीपक पाल यांनी केले त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
भंडारा :- दिनांक 14 जून 2024 ला सायंकाळी 5 वाजता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी नागपूर ते भंडारा वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलीयावर बनविण्यात आलेल्या गॅलरी ऑफ वॉटर रेस्टॉरंटला भेट दिली असता तेथील व्यवस्थापक विनोद वंजारी व दीपक पाल त्याचप्रमाणे नितेश वंजारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गॅलरी ऑफ वॉटर यू रेस्टॉरंटमध्ये कोल्ड्रिंक, आईस्क्रीम, थंड पेय, थंड पाणी , त्याचप्रमाणे ऑर्डर प्रमाणे जेवण सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . त्याचप्रमाणे स्वच्छता राहावी म्हणून कचरापेटी ची व्यवस्था करण्यात आहे . पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 10 सुरक्षा गार्डची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येतील गॅलरी चा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देत असतात .यावेळी त्यांच्यासोबत कुलदीप गंधे, अमित शिवणकर, संदीप वंजारी,निखिल वंजारी ,निमेश वंजारी, अक्षय उके, मंगेश बांते उपस्थित होते.
0 Response to " अंभोरा पुलियावर बनलेल्या गॅलरी ऑफ वाटर रेस्टॉरंटला राज्यसरचिटणीस संजीव भांबोरे यांनी दिली भेट "
एक टिप्पणी भेजें