मान्सुनपूर्व तयारीचा तुमसर शहरात फज्जा
■ जन प्रतिनिधींच्या तक्रारींकडे प्रशासकाची पाठ
तुमसर : पावसाळा अवघ्या तोंडावर असताना नगर पालिकेला अनेकदा लेखी तथा तोंडी सूचना करूनही प्रशासन मान्सून पूर्व तयारीला लागलेले नाही. नाल्यातील गाळ, नाली लगतचे झुडपी वनस्पती, शहराबाहेर सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या नाल्या, रस्त्यावरील जीवघेणे खड्डे, पाण्याखाली येणारे रस्ते, प्रभाग तसेच कचऱ्याची विल्लेवाट सध्या कासव गतीने सुरू आहे. त्याकरिता माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी पालिका प्रशासनाला गत काळातील भयावह पुर परिस्थिती तसेच स्थानिकांच्या समस्यांशी अवगत करून देखील प्रशासक राजवटीत सामान्य नागरिकांच्या समस्यांना पालिका दुजोरा देत असल्याची संतप्त टीका पडोळे यांनी केली आहे. पालिकेला निवेदन देतेवेळी पडोळे यांच्यासह भाजपचे गिता कोंडेवार, कुंदा वैद्य, कल्याणी भुरे, आशीष कुकडे, प्रिती मलेवार, राजकुमार मरठे, शोभा लांजेवार, योगेश रंगवानी, कृष्णा पाटील, पवन पाटील, निशीथ वर्मा, अनुज मलेवार, शांता सार्वे उपस्थित होते. (वि.प्र.) हलक्या पावसात बुडतो गोवर्धन- विनोबा नगर तुमसर शहरात अर्ध्या तासाच्या पावसात नाल्या तुडुंब भरून वाहतात. ब्लॉकेज असलेल्या नाल्या, लोकवस्तीत नवीन नाल्यांच्या नियोजनाचा अभाव, प्रशासकीय उदासीनता याचा नेमका फटका गोवर्धन तथा विनोबा नगराला पावसाळ्यात सहन करावा लागतो. भौगोलिक दृष्ट्या हसारा-हिंगणा भागातील पावसाच्या पाण्याचे लोंढे शहराच्या दिशेने धाव घेतात. त्यात राजाराम लॉन ते पुढे कृषी उत्पन्न बाजार समती या भागात मोठ्या नाल्याचे नियोजन थंडबस्त्यात पाडून आहे. त्यामुळे खालचा भूभाग असल्याने गोवर्धन नगर संवेदनशील प्रभागात मोडतो. तशीच काहीशी परिस्थिती जुन्या शहर वर्डात देखील दिसून येते. त्या मुख्य नाल्याचा उपसा होणे गरजेचे रिलायन्स ट्रेंड्स ते रेल्वे फाटक पर्यंत शहरात रस्त्याच्या दुतर्फा मोठा नाला आहे. मात्र येथे गेल्या अनेक दशकांपासून त्या नाल्यातील गाळ पालिकेने उपसलीच नाही. व्यवसायी संकुलांचा हा भाग असल्याने येथे ऐन पावसाळ्यात विषारी सापांचा दुकानदारांना त्रास सहन करावा लागतो. नाल्याचा प्रवाह शहराच्या दिशेने असल्याने येथे मातोश्री संकुल परिसर अलगद पाण्याखाली येतो. तशीच काहीशी भयावह स्थिती लोटन पोहा मिल परिसरात देखील अनुभवास येते. मात्र प्रशासनाची असंवेदनशील भूमिका नागरिकांच्या रोषाचे कारण ठरत आहे.
0 Response to "मान्सुनपूर्व तयारीचा तुमसर शहरात फज्जा"
एक टिप्पणी भेजें