डॉ.अक्षय कहालकर यांना वैद्यकीय सेवा क्षेत्रातील पुरस्कार प्रदान
पवनी :- पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्धविहार पाथरी(गोसेखुर्द) येथे दि.09/06/2024 ला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला, त्यात वैद्यकीय सेवा क्षेत्रातील पुरस्कार "कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा" चे "डॉ.अक्षय ईस्तारीजी कहालकर" यांना प्रदान करण्यात आला.
"कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा" सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असून भंडारा जिल्ह्यात ओळख आहे. अनेक ठिकाणी मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आयोजित करून गोरगरीब रूग्णांची मोफत सेवा केली जाते. "खाली हाथ आया है, खाली हाथ जायेगा" ह्या दृष्टीकोनातून जिल्हाभर कार्य चालू आहे. तसेच पर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी दवाखाना मार्फत पुढाकार घेण्यात येत आहे. ह्या संपूर्ण कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेने दि. 09 जूनला पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्धविहार पाथरी (गोसेखुर्द) येथे राज्यस्तरीय सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, श्रीकृष्ण देशभ्रतार ,माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुळकर, विदर्भवादी शेतकरी संघटना अध्यक्ष सदानंद धारगावे, देशोन्नतीचे पत्रकार डी.जी. रंगारी, सत्य साई संस्थान चे नागपूरे, डॉ.टेंभेकर, कवी मकरंद पाटील, प्रबोधनकार भावेश कोटांगले, तनुजा नागदेवे आदी उपस्थित होते.
डॉ.अक्षय कहालकर यांना वैद्यकीय सेवा क्षेत्रातील पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात आले, यावेळी शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव मीराताई कहालकर यांनी व इतर हितचिंतकांकडून कौतुकाचा वर्षांव करण्यात आला.
0 Response to " डॉ.अक्षय कहालकर यांना वैद्यकीय सेवा क्षेत्रातील पुरस्कार प्रदान"
एक टिप्पणी भेजें