निर्वाचन आयोग ,राष्ट्रपती, राज्यपाल राखीव लोकप्रतिनिधित्व दिव्यांगांना मिळण्याबाबत ईमेल द्वारे राष्ट्रपतीनां निवेदन.
● अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनाचे संस्थापक श्रीकृष्ण देशभ्रतार व राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी संविधान संशोधन करून दिव्यांगांना लोकप्रतिनिधित्व देण्यासाठी राष्ट्रपती व पंतप्रधानांना केली मागणी.
------------------------------------------------------------------------
भंडारा जिल्हा प्रतिनिधी :- संविधान संशोधन करून निर्वाचन आयोग राष्ट्रपती ,राज्यपाल कडून राखीव दिव्यांगांना लोकप्रतिनिधित्व देण्यात यावे या मागणीचे निवेदन राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू राष्ट्रपती भवन नई दिल्ली त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांना आज दिनांक 30 जून 2024 ला ईमेल द्वारे अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी एका लेखी निवेदन द्वारे केलेली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिव्यांगांना आज पावतो शासनाकडून संविधान संशोधित कोणती मजबूत भूमिका घेतलेली नसून त्यांच्या समस्या मांडण्यासाठी दिव्यांग संघटने द्वारा कोणी ठोस प्रतिनिधित्व करीत नसून त्यांच्या समस्या मांडण्यासाठी बघ्याची भूमिका घेत असतात .त्यामुळे शासनाकडून योजनांच्या फायदा तळागाळातील दिव्यांग पर्यंत पोहोचू शकत नाही. करिता संविधान संशोधन करून निर्वाचन आयोग, राष्ट्रपती, राज्यपाल कडून राखीव दिव्यांगांना लोकप्रतिनिधित्व कायद्याची तरतूद करून दिव्यांग संघटने द्वारे लोकप्रतिनिधित्व मिळवून देण्यात यावे. जेणेकरून शासनाला दिव्यांग बाबत खास कायद्याने अतिशयोक्ती समजून तरतूद करता येईल व योजनेचा आधार व फायदा तळागाळातील दिव्यांगांना मिळू शकेल. दिव्यांगांना कोणत्याही समाजाचा आधार नसल्यामुळे त्यांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे .त्यामुळे शासनाने दिव्यांग यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून संविधानिक संशोधन करून त्यांना 10 टक्के लोकप्रतिनिधित्व मिळाला तर. त्यांना न्याय व त्यांच्या हिरावलेला हक्क देता येईल.असे त्यांनी ईमेल द्वारा पाठविलेल्या निवेदनात नमुद केले आहे.
0 Response to "निर्वाचन आयोग ,राष्ट्रपती, राज्यपाल राखीव लोकप्रतिनिधित्व दिव्यांगांना मिळण्याबाबत ईमेल द्वारे राष्ट्रपतीनां निवेदन."
एक टिप्पणी भेजें