कुलदीप गंधे समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
पवनी :- तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचेऔचित्य साधून 9 जून 2024 ला कुलदीप दीपक गंधे राहणार निमगाव यांचा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक सेवेबद्दल अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे , प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हा प्रभारी डॉ .अक्षय कहालकर, विदर्भवादी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदानंद धारगावे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कुलदीप गंधे हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहतात .वेळप्रसंगी कोणाच्या मदतीला सुद्धा धावून जातात .स्वच्छता मोहीम सुद्धा राबवतात. त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.
0 Response to "कुलदीप गंधे समाजसेवा पुरस्काराने सन्मानित "
एक टिप्पणी भेजें