सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत अर्ज आमंत्रित
गोंदिया :- शासन निर्णयानुसार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज 15 जुलैपर्यंत मागणविण्यात आले आहे. योजनेंतर्गत सविस्तर अटी व शर्तीबाबतचे शासन निर्णय 11 मार्च 2024 च्या www.maharashtra.gov.in या त्याचा इयत्ता 12 वी नंतरच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतू इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा अशा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता देण्यासाठी रक्कम बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केलेली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पुरावे
भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रतिज्ञापत्र. स्वयंघोषणापत, कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र. भाड्याने राहात असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे रारपत्र/करारनामा. महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबाबतचा पुरावा. महाविद्यालयातील उपस्थिती किमान 75 टक्के असणे आवश्यक राहील. अटी व शर्तीनुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात द्वितीय, तृतीय व अंतीम वर्षात शिकत असलेल्या पात्र विद्यार्थी / विद्यार्थिनींनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, पतंगा मैदान, गोंदिया येथे आवश्यक कागदपत्रासह 15 जुलैपर्यंत अर्ज सादर करावे. असे आवाहन विनोद मोहतुरे, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, गोंदिया यांनी केले आहे.
अशा राहणार अटी
विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला. अनाथ असल्यास महिला व बाल कल्याण विभागाकडील अनाथ प्रमाणपत्र. दिव्यांग असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांचे 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांना आधार क्रमांक राष्ट्रियकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील. प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे. अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा. अर्ज करतांना किमान 60 टक्के गुण व दिव्यांगास 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे
0 Response to "सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत अर्ज आमंत्रित"
एक टिप्पणी भेजें