पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे अवचित साधून समाजसेवक तथा जनता की आवाज चे मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांचा तुमसर नगरी येथे सत्कार
श्रीकृष्ण देशभ्रतार हे सामाजिक , राजकीय ,क्षेत्रात कार्यरत असून मागील २० वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून जनता की आवाज वर्तमानपत्राचे मुख्य संपादक त्याचप्रमाणे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हा सचिव आहेत.त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळालेला आहे . त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन
कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा यांच्यामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. कहालकर दुःख निवारक दवाखाना साई मंदिर समोर भंडारा जिल्ह्यात अग्रेसर असून जिल्ह्यात ओळख आहे, अनेक ठिकाणी मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आयोजित करून गोरगरीब रूग्णांची सेवा केली करण्यात आली ., खाली हाथ जायेगा" ह्या दृष्टीकोनातून जिल्हाभर कार्य चालू आहे. तसेच पर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी दवाखाना मार्फत पुढाकार घेण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा चे डॉ.अक्षय कहालकर, शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रेषिताताई कहालकर, सचिव मीराताई कहालकर, पंकज कहालकर, शितल चामट यांनी सहकार्य केले.
0 Response to " पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे अवचित साधून समाजसेवक तथा जनता की आवाज चे मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांचा तुमसर नगरी येथे सत्कार"
एक टिप्पणी भेजें