पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून विश्रामभवन भंडारा येथे विविध मान्यवरांचा सत्कार
हर्षवर्धन देशभ्रतार
भंडारा :- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाच्या अवचित्त साधून भंडारा येथील विश्राम येथे सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम ,भाऊ कातोरे जिल्हा प्रेमी, गोविंदा कातोरे पोलीस पाटील ,पंकज वानखेडे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार प्राध्यापक प्रेमानंद हटवार ,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी प्राध्यापक जांगडे, मनोज बागडे, प्रेमसागर गणवीर, प्राध्यापक राहुल मानकर ,अमृत बनसोड ,पत्रकार समाजभूषण डी जी रंगारी ,सूर्यभान हुमणे , धनपाल गडपायले , शीलवंत मेश्राम, चंद्रमणी गोंडाने समाजभूषण,आदी मान्यवर व असंख्य कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Response to "पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून विश्रामभवन भंडारा येथे विविध मान्यवरांचा सत्कार "
एक टिप्पणी भेजें