-->

फ़ॉलोअर

आमिष देणाऱ्या अॅप्स पासून जनतेने सावध राहावे भंडारा जिल्हा पोलिस दलातर्फे जनतेस आवाहन

आमिष देणाऱ्या अॅप्स पासून जनतेने सावध राहावे भंडारा जिल्हा पोलिस दलातर्फे जनतेस आवाहन



 भंडारा :- आजच्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक व युगामध्ये इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वापर जास्त प्रमाणात होत असल्यामुळे विकासात भर पडलेली दिसून येत असली तरी फसवणुकीचे प्रकारात सुद्धा दिवसेंदिवस वाढ झाल्याचे दिसून येत आहे अनोळखी क्रमांकावरून येणा रे फोन कॉल वर बोलणे करून त्यांना आपले एटीएम पिन क्रमांक देणे, पासवर्ड सांगणे यासारख्या घटना घडवून त्या- 'चे खात्यातून पैसे गेल्याचे घटना ह्या जुन्या झाल्या आहेत.

                भंडारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी बोरा बँड अँप मध्ये जनतेने लाखो रुपये गुंतवणूक केले परंतु अचानक बोरा बँड बंद पडल्याने जनतेचे लाखो रुपये लंपल झाल्याने पोलीस स्टेशन भंडारा येथे फसव- णुकीच्या गुन्हा नोंद झालेला आहे त्याच धर्तीवर फ्रॉडस्टर यांनी नवीन चक्कर लावत बोरा बँड चे नवीन वर्जन अँड्रोमॅक्स प्रो अॅप्स सध्या भंडारा जिल्ह्यात आणलेले आहे. संपूर्ण भंडारा जिल्ह्यात सध्या ह्या नवीन वर्जन अँड्रोमॅक्स प्रो ने धुमाकूळ घातला आहे सदर अँड्रोमॅक्स प्रो अॅप्स भंडारा जिल्ह्यातील भोळी-भाबळी जनता कमी दिवसात दाम दुप्पट रक्कम मिळवण्याच्या आमिषाला बळी पडत दिसत आहे त्याकरिता भंडारा जिल्हा पोलिसातर्फ नागरिकांना आवाहन करण्यात येते की यासारख्या प्रलोभनाज बडी पडू नये.

                सध्याचे काळात फसवणूक करणारा व्यक्ती हे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बनवून जनतेला कमी दिवसात दाम दुप्पट रक्कम देण्याचे आम्हीच दाखवतात व लोका- 'कडून मोठ्या रकमांची गुंतव- णूक करून घेतात काही दिव सानंतर असे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म अचानक बंद केली जातात व नागरिकांचे गुंतवलेले मूळ पैसे परत न करता फसवणूक केली जाते भंडारा जिल्हा पोलिसात- र्फ नागरिकांना आवाहन करण्यात येते की यासारख्या प्रलोभनाज बळी पडू नये नागरिकांना पैसे गुंतवणूक क- रावयाची असल्यास भारत सरकार अंतर्गत एसईबीआय (सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) द्वारे मान्यता प्राप्त प्लॅटफॉर्म महत्त्व अधिकृत करूनच गुंतवणूक करावी. असे सायबर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया/स्टेटमेंट

अनाधिकृत फसव्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म द्वारे आकर्षक परतावा किंवा कमी दिवसात दाम दुप्पट रक्कम देणे या सारख्या प्रलोभनास नागरिकांनी बळी पडू नये. आपल्या कष्टाचे मेहनतीचे पैसे फसव्या अॅप्स मध्ये गुंतवणूक करू नये. अँड्रोमॅक्स प्रो अॅप्स केव्हाही बंद होऊन आपले सोबत फसवणूक होऊ शकते करिता नागरिकांनी सावध राहावे.

   मा. लोहित मतानी, 

पोलिस अधीक्षक भंडारा

0 Response to "आमिष देणाऱ्या अॅप्स पासून जनतेने सावध राहावे भंडारा जिल्हा पोलिस दलातर्फे जनतेस आवाहन"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article