-->

फ़ॉलोअर

 लोकनेते प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी केली 'त्या' पीडित कुटुंबीयांना मदत

लोकनेते प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी केली 'त्या' पीडित कुटुंबीयांना मदत


लाखनी :- तालुक्यातील नान्होरी / दिघोरी येथील तारकेश्वर रामकृष्ण उरकुडे, विलास मारोती उरकुडे आणि शेवंता विठ्ठल उरकुडे यांच्या घराला आग लागली आणि संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. उपासमारीची पाळी असतांनाच लोकनेते नानाभाऊ पटोले यांनी त्या पीडित कुटुंबांना तातडीची मदत केली.

तालुक्यातील नान्होरी / दिघोरी येथील रहिवासी तारकेश्वर रामकृष्ण उरकुडे, विलास मारोती उरकुडे आणि शेवंता विठ्ठल उरकुडे रोजच्या प्रमाणे पोट भरण्यासाठी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मजुरीला गेले होते. बुधवार ( ता. ५ ) दुपारी १ वाजताच्या दरम्यान घरालगत असणाऱ्या विजेच्या खांबावर स्पार्क होऊन ठिणगी घरावर पडल्याने ३ घरे जळल्याची घटना नान्होरी येथे घडली. नान्होरी येथे भरवस्तीत उरकुडे परिवारांचे वास्तव्य असून अचानक आग लागली व पाहता पाहता आगीने वेग घेतला. लगेचच शेजारच्यांना सदर बाब लक्षात आली व आरडाओरड केल्याने गावकरी गोळा होऊन आग आटोक्यात आणली. वेळीच आग नियंत्रणात आल्याने जीवितहानी टळली. मात्र घरातील उदरनिर्वाहाचे साहित्य बरोबरच आवश्यक कागदपत्रे जळून खाक झाली अशातच कुटुंब उघड्यावर पडले. अशातच एका गावातील सुज्ञ नागरिकांनी नानाभाऊ पटोले यांना भ्रमणध्वनीवरून कुटुंबीयांची आपबीती सांगितली व लागलीच नेहमीप्रमाणे लोकनेते नानाभाऊ पटोले यांच्या कडून त्या पीडित कुटुंबांना रोख आर्थिक मदत देऊन देऊन कुटुंबातील व्यक्तींना आधार दिला.


यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष योगराज झलके, माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, विनोद भुते, भूपेश शेंडे, मुन्ना देशमुख, मयुर खरवडे, नजीर छव्वारे व गावातील नागरिक उपस्थित होते.

0 Response to " लोकनेते प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी केली 'त्या' पीडित कुटुंबीयांना मदत"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article