-->

फ़ॉलोअर

 संजीव _एक ध्रुवतारा.... 9  जून वाढदिवसानिमित्त विशेष लेख

संजीव _एक ध्रुवतारा.... 9 जून वाढदिवसानिमित्त विशेष लेख

लेखक रत्नराजश्रीपुत्र मकरंद पाटील, जळगाव

संजीव भांबोरे

मनुष्य म्हणून या पृथ्वीतलावरती जन्माला येणं आणि माणुसकीच जीवन जगताना इतरांना आनंदीत करणं हे फार कमी लोकांना जमतं. एक फुल, एक पान सजीव म्हणून एखाद्या वृक्षावरती जन्माला येतं -फुल किती लहान असतं ,इवलस असतं आणि त्या फुलाला आयुष्यमान तरी किती हो दोन दिवस, चार दिवस, पाच दिवस बस यापलीकडे नाही . परंतु या कमीत -कमी वेळेत हे फुल कळी म्हणून झाडावरती जन्माला येतं पाकळी- पाकळी फुलत. फुलताना वाहणाऱ्या वाऱ्याला आपलं सुगंध देत झाडावरती टिकून राहण्यासाठी संघर्ष करत राहत. एखादा भुंगा त्याच्याजवळ आला तर स्वतः मधला मकरंद ही त्या भुंग्याला अर्पण करत आणि आयुष्यमान संपलं की पुन्हा या मातीमध्ये रुजतं खत म्हणून उपयोगी येत. समाजातील अनेक व्यक्तिरेखा या जन्माला येतात, जगतात ,निघून जातात कुठेही त्यांची दखल घेतली जात नाही किंवा अशा लोकांना हे लक्षातही येत नाही की मला मिळालेल जीवनदान हे मौल्यवान आहे.  या समाजाला, या देशाला, या राष्ट्राला माझा काहीतरी उपयोग झाला पाहिजे असा विचार करणारे फार कमी आणि जे विचार करतात ते अनमोल असतात. अगदी आपले पत्रकार बंधू संजीवजी भांबोरे साहेबांसारखे. कुणी जगत असताना स्वतःच्या आयुष्यातल्या उणीवा मोजत असतं की माझा जन्म इथे झाला मी जर मोठा घराण्यात जन्माला आलो असतो तर ,मी नक्कीच काहीतरी केलं असतं. माझ्याकडे तर पैसेच नाहीत, माझ्याकडे तर वेळच नाही, मला चांगलं कामच नाही अशा एक ना अनेक प्रकारच्या समस्या प्रत्येकाला असतातच. पण स्वतःच्या समस्या बाजूला ठेवत त्या समास्यांचा निराकरण करत समाजात असलेल्या अडचणींना उत्तर म्हणून उभे राहणं हे फार मोजक्याच लोकांना जमत आणि अशी व्यक्तिरेखा ही अद्वितीय असते. समाजासाठी एक संजीवनीच असते आणि अशीच मानवीय संजीवनी म्हणजेच संजीवजी भांबोरे. एका छोट्याशा भंडारा तालुक्यातील पहेला खेड्यामध्ये जन्माला येऊन स्वतःच शिक्षण पूर्ण करत असताना वयाच्या सोळाव्या वर्षीच समाजकार्यामध्ये स्वतःचा सहभाग नोंदविणारा हा अवलिया व्यक्ती. समाजात होणारे वाद, विवाद, असमानता, अन्याय, अत्याचार स्वतःच्या डोळ्यांनी बघून जीवाची तगमग झाल्यानंतर या साऱ्याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्वतःच्या  हातामध्ये लेखणी रुपी तलवार घेणारा ध्येयवेढा योद्धा. अनेक  घटना या समाजाच्या तळागाळामध्ये घडतात आणि मोठी लोक या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत मग अशा लोकांपर्यंत कोणीतरी पोहोचायला हवं अशा लोकांचा आवाज कोणीतरी व्हायला हवा या लोकांना न्याय कोणीतरी द्यायला हवा अशी विचारधारा मनामध्ये पेटवत -फुले शाहू ,आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा स्वतःच्या विचारांमध्ये रुजवत एका छोट्या खेड्यातला व्यक्ती पेटवून उठतो. विद्रोह करतो तो माणुसकीसाठी, समाजातल्या तळागाळातल्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी. त्याच्या अनेक प्रयत्नांना यश येतं मग या समाजातल्या छोट्या माणसालाही हा व्यक्ती आपला वाटू लागतो मन मोकळ करण्यासाठी स्वतःच्या दुःखाला औषध रुपी संजीवनी म्हणून उपचार म्हणून नाव आठवतं ते संजीव भांबोरे. अचानक एखाद्या व्यक्तीशी या व्यक्तीची भेट व्हावी आणि काही काळाच्या सहवासामध्ये भांबोरे साहेब त्या व्यक्तीला आपलंसं करून घेतात ते आपल्या अनोख्या मैत्रीच्या शैलीतून हा माणूस हवाहवासा वाटायला लागतो. वाट चुकलेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन करणं, त्याच्या प्रश्नांना औपचारिक रित्या शासनाच्या दारात पोहोचवणं हे काम अगदी निस्वार्थपणे करतोय. एखाद्या सामान्य कुटुंबात अन्याय झाला असेल तर त्वरित त्याला न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोशल मीडियाचा वापर करून न्याय मिळवून देणं हे संजीव भांबोरे आपला आद्य कर्तव्य समजतात.  स्वतःच्या लेखणीच्या जोरावर अनेक वृत्तपत्र सचोटीने हाताळणारा म्हणूनच महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्रांचा प्रतिनिधी म्हणून ओळख त्यांना प्राप्त आहेच, याच आधारावर जवळपास मागची तीन दशक अगदी सत्याच्या आधारावरती बातमीच निरूपण करण्याचे काम संजीवजी भांबोरे करत आहेत. समाजातील अन्याय अत्याचाराच्या विरोधात कोणतीही कमतरता असतील या उणिवा भरून काढण्यासाठी आक्रमक आणि विद्रोही भूमिका घेत समाजातील आधारस्तंभ म्हणून संजीव भांबोरे आपली भूमिका स्पष्ट करतात. संजीवजी भांबोरे या व्यक्तिरेखेचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे स्पष्ट वक्तेपणा कुठलाही अधिकारी असो वा राजकीय नेता असो त्यांच्या अधिकार शाहीला न जुमानता आपले मत स्पष्टपणे मांडण्याची कला निसर्गतःच त्यांच्या अंगी आलेली आहे असं वाटतं. समाजात जीवन जगत असताना अनेक दिव्यांग बंधू भगिनी आपण पाहत असतो .अतिशय संघर्षमय जिवन हे जगत असतात. त्यांचं जगणं काही प्रमाणामध्ये सुखकर करण्यासाठी संजीवजी भांबोरे यांनी एक क्रांतिकारी संघटनेची  केलेली अध्यक्ष स्वरूपात या संघटने ला चालवतात. ती चळवळ  म्हणजेच अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना. जणू ही संघटना या दिव्यांग बंधू भगिनींचे प्रश्न मार्गी लावते. ज्याप्रमाणे प्रवासाला निघालेल्या प्रवाशाला अंधाराच्या वेळी मार्गक्रमन करण्यासाठी आकाशातील ध्रुवतारा मदत करत असतो त्याचप्रमाणे एका शिस्तबद्ध स्वरूपात या समाजातील बांधवांचा आवाज उठवण्यासाठी म्हणून जणू संजीव भांबोरेच एका ध्रुव तार्‍याची भूमिका  निभावताना  आपल्याला दिसतात. उत्तम निर्णय ,क्षमता असल्यामुळे अनेक अध्यक्षीय पदे यांनी भूषवली .साहित्य क्षेत्रामध्ये ही उल्लेखनीय कामगिरी यांची सुरूच आहे. म्हणूनच यांना अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय मीडिया प्रमुख म्हणून यांची निवड झालेली आहे. समाजमन ओळखणारा आणि मनमोकळे दिलखुलास व्यक्तिमत्व यामुळे अनेक कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते, मार्गदर्शक, उद्घाटक ,म्हणून संजीवजी भांबोरे यांना आमंत्रित करण्यात येतेच. अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने आत्तापर्यंत यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.अशा या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचा जन्मदिवस म्हणजेच 9 जून .याही दिवशी सामाजिक उपक्रम राबवून समाजासाठीच हा दिवस संजीवजी समर्पित करतात. याच दिनाचे औचित्य साधत त्यांच्या सामाजिक, संघर्षमय जीवनाचा लेखाजोगा  मांडण्याचा प्रयत्न मी केला. अशा अनन्यसाधारण व्यक्तिमत्व असलेल्या श्री संजीवजी भांबोरे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. 


          लेखक

       रत्नराजश्रीपुत्र

 मकरंद पाटील जळगाव

0 Response to " संजीव _एक ध्रुवतारा.... 9 जून वाढदिवसानिमित्त विशेष लेख"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article