-->

फ़ॉलोअर

 संजीव भांबोरे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य आरोग्य शिबीर, फराळवाटप, वृक्षारोपण व विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा भव्य सत्कार समारोह कार्यक्रमाचे 9 जूनला शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथेआयोजन

संजीव भांबोरे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य आरोग्य शिबीर, फराळवाटप, वृक्षारोपण व विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा भव्य सत्कार समारोह कार्यक्रमाचे 9 जूनला शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथेआयोजन

भंडारा : कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा व शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खराशी द्वारा दि.09 जून 2024 रोज रविवारला दुपारी 3  वाजता पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी ( चिचाळ ) येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर, फळवाटप ,वृक्षारोपण कार्यक्रम व विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेतर्फे सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

मा. संजीव भांबोरे हे सामाजिक , राजकीय क्षेत्रात कार्यरत असून मागील पंचवीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून अनेक वर्तमानपत्रात जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळालेला आहे . त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन  09 जूनला कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा मार्फत भव्य आरोग्य शिबीर, फराळवाटप व विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक कार्यकर्तांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने कवी मकरंद पाटील समाज भूषण जळगाव चंद्रशेखर टेंभुर्णे माजी समाज कल्याण सभापती सामाजिक सेवा ,नाशिक चवरे प्रबोधनकार तथा कवी ,रोशन जांभुळकर सामाजिक क्षेत्र ,पत्रकार डी जी रंगारी अंधश्रद्धा निर्मूलन , शितल अतुल नागदेवे कलाक्षेत्र,प्राध्यापक शेखर बोरकर पत्रकारिता सेवा पंकज वानखेडे सामाजिक क्षेत्र, इंजिनिअर रूपचंद रामटेके सामाजिक क्षेत्र ,श्रीकृष्ण देशभ्रतार  पत्रकारिता सेवा ,कुलदीप गंधे सामाजिक क्षेत्र ,पंकज रहांगडाले पत्रकारिता सेवा, तुळशीराम गेडाम धम्म चळवळ ,अचल मेश्राम फुले शाहू आंबेडकर चळवळ ,डॉ अक्षय कहालकर सामाजिक वैद्यकीय सेवा, सदानंद धारगावे सामाजिक कार्य ,चंद्रशेखर खोब्रागडे सामाजिक कार्य ,आशिष चेडगे पत्रकारिता सेवा, प्रबोधनकार भावेश कोटांगले कला क्षेत्र ,डॉ भैयालाल मेश्राम सामाजिक सेवा ,पत्रकार विलास केजरकर समाजसेवा ,प्राध्यापक प्रेमानंद हटवार पत्रकारिता सेवा धम्मरक्षित जीवबोधी बौद्ध (मेश्राम) धम्म चळवळ ,मीरा भट बेटी बचाव तुमसर, प्राध्यापक प्राची चटपविद्यार्थ्यांना निशुल्क आट्यापाट्या खेळाचे प्रशिक्षण व क्रीडाक्षेत्र महाराष्ट्र कर्णधार, एडवोकेट वसुधा  मेगरे गरीब मुलींकरिता निशुल्क इंग्रजी वर्ग गोविंदा कुरंजेकर पोलीस पाटील सावली सामाजिक सेवा भाऊराव पंचवटे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार उघड भाऊ कातोरे पिपरी पुनर्वसन समाजसेवक जिल्हा प्रेमी ,भंते विनय बोधि महादेव धम्म चळवळ, प्रीतम राजा भोज 90 वेळा रक्तदान करून अनेकांचे जीव वाचविण्याची धडपड, अशा विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर जिल्ह्यात म्हणून ओळख आहे, अनेक ठिकाणी मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आयोजित करून गोरगरीब रूग्णांची सेवा केली जाते. "खाली हाथ आया है, खाली हाथ जायेगा" ह्या दृष्टीकोनातून जिल्हाभर कार्य चालू आहे. तसेच पर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी दवाखाना मार्फत पुढाकार घेण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा चे डॉ.अक्षय कहालकर,  शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रेषिताताई कहालकर,  सचिव मीराताई कहालकर,  पंकज कहालकर, शितल चामट आदी सहकार्य करीत आहेत.

0 Response to " संजीव भांबोरे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य आरोग्य शिबीर, फराळवाटप, वृक्षारोपण व विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा भव्य सत्कार समारोह कार्यक्रमाचे 9 जूनला शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथेआयोजन"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article