मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेतून 60 ते 65 वयोगटातील महिलांना , डावलले
पत्रकार संजीव भांबोरे यांनी उपसरपंच संघदिप देशपांडे यांच्याशी केलेली बातचीत
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- 28 जून 2024 रोजी महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यात आले .त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना मुख्यमंत्री लाडली बहीण योजना या योजनेअंतर्गत दीड हजार रुपये देण्याचे मान्य केले व त्याच्या जीआर सुद्धा काढण्यात आला . परंतु ही योजना 21 ते 65 वयो 65 गटातील महिलांना केली असती तर खऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असता. कारण 60 ते 65 वयोगटातील महिलांना कोणत्याही योजनेचे लाभ मिळत नाही.अशाप्रकारे आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा महासचिव तथा उपसरपंच संघदिप देशपांडे यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांच्याशी एका मुलाखती दरम्यान बोलताना सांगितले व त्यांनी शासनाला धारेवर धरले . त्याचप्रमाणे या योजनेत डोनेशियल रहवासी प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. त्याचप्रमाणे बऱ्याच महिलांनी लग्न सुद्धा काही कारणास्तव केलेले नाही. अशा महिलांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे. त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दिवसेंदिवस महागाई वाढत असताना सर्व वस्तूचे भाव गगनाला भिडले असताना अशा परिस्थितीत शासनाने लाडली बहीण योजनेची जी घोषणा केली त्या योजनेत कमीत कमी 3000 हजार रुपये महिन्याला घोषित करायला पाहिजे होते. केंद्र सरकारने ठरविलेल्या मनरेगा योजनेच्या दरापेक्षाही कमी शासनाने ठरविले आहे.त्यामुळे ही योजना महिलांकरिता सर्व समावेश असावी.जेणेकरून सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळेल .ज्या मुलींचे वय 21 वर्षापेक्षा जास्त आहे व ज्यांचे लग्न झालेले नाहीत अशा मुलींना सुद्धा योजनेचा लाभ द्यायला पाहिजे होता व या योजनेचा लाभ संपूर्ण बीपीएल पात्र लाभधारक अशा सर्व महिलांना मिळायला पाहिजे होता. संयुक्तरित्या शेती या योजनेतून शेतकरी महिलांना वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे या महिला सुद्धा योजनेतून वंचित राहणार आहेत.
0 Response to " मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेतून 60 ते 65 वयोगटातील महिलांना , डावलले "
एक टिप्पणी भेजें