प्राचार्य,अरुण मोटघरे यांनी नौकरी चा ज्यास्ती चा लाभ व ज्यास्तीचा आर्थिक लाभ मिळण्याकरिता टीसी वर जन्म तारखेत फेरफार केल्याने दिवाणी न्यायालय,पवनी कडून IPC धारा ४२०,४६८,४७१ अन्वये FIR चे आदेश
संजीव भांबोरे
भंडारा जिल्हा प्रतिनिधी :- सविस्तर वृत्त असे की, स्व.श्री. लक्ष्मणजी मोटघरे चॅरिटेबल ट्रस्ट,नागपूर द्वारा कोंढा - कोसरा,तह.पवनी जिल्हा.भंडारा येथे या ट्रस्ट द्वारा रा. तु. म.नागपूर विद्यापीठ द्वारा संलग्नित डॉ.अरुण मोटघरे महाविद्यालय, कोंढा - कोसरा,या गावात हे महाविद्यालय सण २००० साला पासुन सुरु आहे. या महाविद्यालयाला २००८ पासून शासनाकडून अनुदान सुरू आहे.या महाविद्यालयाचे प्राचार्य तथा ट्रस्ट चे अध्यक्ष श्री.अरुण लक्ष्मण मोटघरे हे सण २००८ पासून प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.या आधी श्री.अरुण मोटघरे हे ' सेवादल महिला महाविद्यालय,' उमरेड रोड,नागपूर ला दि.२७/०९/१९९६ ला ' शारीरिक शिक्षक ' या पदावर रुजु झालेत.व यांच्या सेवेला १२ वर्ष पूर्ण केल्या नंतर दि.१९/०४/२००८ ला या महाविद्यालयांनी डॉ.अरुण मोटघरे महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रूजु होण्यासाठी कार्यमुक्त केले.श्री.अरुण मोटघरे नी सेवादल महिला महाविद्यालयात नौकरीवर लगतेवेळेस " माधवराव वानखेडे शारीरिक शिक्षण महाविद्यालय ", कामटी या कॉलेज ची M.P.Ed.चे शिक्षण पूर्ण केल्याची टीसी दिली त्या टीसी वर यांची जन्म तारीख हि १०/०७/१९६७ आहे.आणि याच कॉलेज च्या दाखल खारिजवर जन्म तारीख हि १०/०७/१९६४ आहे.तसेच वर्ग पहिली ते नौकरी वर लागेपर्यंत च्या संपूर्ण कॉलेज,शाळेच्या दाखल खारीज वर यांची जन्म तारीख हि १०/०७/१९६४ आहे.तसेच ग्रामपंचायत कार्यालय,विरली(खंदार) ला जन्माची नोंद नसल्याची माहिती हि माहिती अधिकारात तक्रार कर्ते श्री.भाऊराव पंचवटे यांनी माहिती मिळविली आणि संपूर्ण शाळेच्या दाखल खरिजची सुद्धा माहिती मिळविली.तेव्हा श्री.अरुण मोटघरे यांनी नौकरीवर लगतेवेळेस स्वतःच्या हस्तअक्षरात बनावट टीसी तयार करून जास्तीचा नौकरी चा व ज्यास्तीचा आर्थिक लाभ मिळन्याकरिता बनावट टीसी तयार केल्याचे निष्पन्न झाले.त्या नंतर या प्रकरणावर तक्रार कर्ते श्री.भाऊराव पंचवटे यांनी संपुर्ण पुरव्यासहित पोलीस स्टेशन, अड्याळ ला.तक्रार दिली.त्याच बरोबर रा. तु. म.नागपूर विद्यापीठ,नागपूर,सहसंचालक(उच्च शिक्षण)नागपूर विभाग नागपूर,संचालक(उच्च शिक्षण)म.रा.पुणे यांचे कडे व जिल्हाधिकारी भंडारा यांचे कडे तक्रार दिली.तेव्हा.जिल्हाधिकारी,भंडारा यांनी सहसंचालक(उच्च शिक्षण)नागपूर विभाग यांना चौकशी करून कारवाही करण्याचे आदेश दिले.त्या आदेशावरून
सहसंचालक(उच्च शिक्षण)नागपूर विभाग यांनी दोनदा चौकशी केली परंतु अरुण मोटघरे यांनी कोनतेही जन्माचे टोस पुरावे सादर करू शकले नाहीत.परंतु संबंधित प्रशासन व पोलीस स्टेशन, अड्याळ कारवाही करीत नसल्याने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी पवनी,येथे सण २०२१ ला.श्री.भाऊराव पंचवटे नी कंप्लेंट केस दाखल केली.त्या केस वर दि.०७/०५/२०२४ ला.शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याने व नौकरी वर लागण्याकरिता ज्यास्तीचा काळ व ज्यास्तीचा आर्थिक लाभ मिळावा या करिता बनावट दस्ताऐवज तयार केले व ते खरे आहे.म्हणून त्याचा वापर केला.करिता विद्यमान कोर्ट नी IPC कलम ४२०,४६८,४७१ अन्वये गुन्हा केल्याबाबदची दखल घेऊन FIR चा आदेश केलेला असून हे प्रकरण दिवाणी व फौजदारी न्यायालय,पवनी यांना सदर प्रकरण नियमित फौजदारी खटला नोंदवून चालवावे असे आदेश करण्यात आले आहे.या आधी सहसंचालक(उच्च शिक्षण)नागपूर विभाग यांनी आपल्या कार्यालय चा चौकशी समितीचा अहवाल विद्यापीठाकडे कारवाही साठी सहसंचालक(उच्च शिक्षण)नागपूर विभाग यांनी पाठविला,त्यानंतर विद्यापीठांनी सुद्धा चौकशी केली याही चौकशी समोर प्राचार्य नी कोणतेच जन्माचे टोस पुरावे सादर करू शकले नाहीत.त्यामुळे विद्यापीठांनी तात्काळ निलंबनाची कारवाही केली आहे.परंतु हायकोर्ट खंडपीठ नागपूर,येथे चुकीच्या माहितीची पिठीशन प्राचार्य नी दाखल करून स्टे घेतलेला आहे.आणि आता हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.या कंप्लेंट केस ची संपूर्ण बाजु अधिवक्ता श्री.सुरेश भांडारकर यांनी मांडली,तसेच याच महाविद्यालय चे मुख्यलीपिक तथा प्राचार्य चे बहिण जावई श्री. शालिकराम उकरे यांनी सुद्धा वयात बसत नसताना सुद्धा शासनाची दिशाभूल करून नोकरीवर लावले. या प्रकरणावर सुधा पवनी च्या कोर्ट मध्ये सण २०२१ ला कंप्लेंट केस दाखल केले असल्याचे व न्याय प्रविष्ट असल्याचे तक्रार कर्ते श्री.भाऊराव पंचवटे नी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.तसेच शिष्यवूत्ती घोटाळ्याची कंप्लेंट केस कोर्ट मध्ये चालू असल्याचे सांगितले आहे.
0 Response to "प्राचार्य,अरुण मोटघरे यांनी नौकरी चा ज्यास्ती चा लाभ व ज्यास्तीचा आर्थिक लाभ मिळण्याकरिता टीसी वर जन्म तारखेत फेरफार केल्याने दिवाणी न्यायालय,पवनी कडून IPC धारा ४२०,४६८,४७१ अन्वये FIR चे आदेश"
एक टिप्पणी भेजें