महाबोधी उपासक संग नागपूरच्या वतीने शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे लग्न विवाह सोहळा कार्यक्रम संपन्न
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- दिनांक 26 मे 2024 ला रोज रविवारला दुपारी 1.30 वाजता महाबोधी उपासक संघ जुना कळमना रोड कावळा पेठ नागपूर शाखा शांतीवन बुद्ध विहार च्या वतीने बौद्ध विवाह रीती रीवाजाप्रमाणे भंते संघानंद व श्रामनेर बुद्धपाल यांच्या उपस्थितीत विवाह संपन्न झाला .नियोजित वराचे नाव प्रशांत गौतम रंगारी वय 35 वर्षे वाडी नागपूर असून वधू सुरभी विजय रामटेके वय 29 वर्षे मुक्काम केसलवाडा तालुका पवनी येथील रहिवासी आहेत. आज संपूर्ण निमंत्रित पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांच्या विवाह संपन्न झाला. यावेळी संस्थेच्या वतीने वधू-वरांना विवाह प्रमाणपत्र देताना भंते सघानंद ,श्रामनेर बुद्धपाल, संजीव भांबोरे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते ,सदानंद धारगावे सामाजिक कार्यकर्ते, आशिष मेश्राम माजी ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सुखदेवै, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Response to "महाबोधी उपासक संग नागपूरच्या वतीने शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे लग्न विवाह सोहळा कार्यक्रम संपन्न "
एक टिप्पणी भेजें