कामगाराला कोणती जात धर्म नसते, संविधानातील आपल्या न्याय हक्कासाठी एकसंघ झाले पाहिजे - आनंद म्हस्के
मुंबई प्रती :- ब्रिटिशानी भारतात पहिला नियमन कायदा कारखाना १८८१ साली पास केला. तर डॉ. बाबासाहेब यानी १९३६ साली प्रथमच स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून कारखानदार, जमीनदार आणि भांडवलदार वर्गात गरीब आणि श्रीमंत याचे स्वभाव सारखा नसून काँग्रेस हा गरीबचा नव्हे तर धनाढ्य उद्योगपतींचा पक्ष असल्याचे लक्षात आणून दिले होते. कष्ट करणारा कामगार व शेतकरी नग्न व उपाशी असून त्याची सर्व संपत्ती आणि उत्पादनाची साधने हे नफेखोर, जमीनदार वर्ग, भांडवलदार आणि श्रीमंत वर्ग यांनी मनमानीपणे लादलेल्या खाजगी संपत्तीच्या अधिकारांनी बेकायदेशीर अन्याग लूट, दरोडा आणि चोरी करून ही सर्व संपत्ती बळकावली असल्याचे १९३५ साली सांगत आहेत. काय योगायोग त्याच काँग्रेसचे राहुल गांधीं २०२४ च्या निवडणुकीत भांडवलशाहीने बळकावली संपत्ती गरीवाची गरिबी दूर करण्यास आणि शेतकऱ्याची कर्ज माफ करण्याची भाषा सत्ता मिळविण्यासाठी करीत आहेत असे आंबेडकरी साहित्यिक आनंद म्हस्के आपल्या भाषणात म्हणाले.
ऑल इंडिया एससी, एसटी, रेल्वे एमपलीचंज अशोशिएशन मध्य रेल्वे मुंबई मण्डल ओपन लाईन शाखा कुर्ला यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष गौरीशंकर नागदेव सचिव व्ही. बी. गायकवाड कोषाध्यक्ष धर्मलिंग मीना उपस्थित होते. वक्ते आनंद म्हस्के पुढे आपल्या भाषणात म्हणाले महात्मा फुले, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार चळवळीचा पाया घालून कामाचे तास आणि रविवारची सुट्टी जाहीर केली. ब्रिटिश व्हाईसरॉय कार्यकारी परिषदेचे १९४२ ते १९४६ या ४ वर्ष सदस्य असलेले डॉ. बाबासाहेब ७ सप्टेंबर १९४३ रोजी कामगार मंत्री झाले. आणि अतिशय प्रभावी भाषणात श्रमिकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, सांस्कृतिक सुविधा आणि आरोग्य संसाधनांच्या मागण्या स्पष्ट केल्या.
डॉ. बाबासाहेब यानी संविधान निर्मितीत कामगार कल्याणासाठी एम्पलमिन्ट पासून पेशन पर्यंत १०० च्या वरती कायदे करून कामगारांना संरक्षण कवचकुंडले दिली. परंतु कामगार कायदे रद्द करून कामगार वर्गाला देशोधडीला लावले, सरकारी नोकऱ्या नाहीत. असलो तरी त्यांना पेन्शन नाही. कंपन्या बंद आहेत. जगातील सर्वात तरुण देश भारत पण तीच तरुण बेकारी बेरोजगारीचे हेरान आहे. संविधान बचाव देश बचावचा नारा दिला जात आहे. अश्या बिकट परिस्थिती कामगार वगनि एकत्र येवून कामगार आणि त्याचे हक्क अधिकार वाचविले पाहिजेत. कामगाराला कोणता धर्म जात नसते. संविधान वाचले तर त्याचे हक्क अधिकार वाचविले. डॉ. बाबासाहेब याचा स्वतःच्या जयंतीला विरोध होता. त्याच्या दृष्टीने लाखमोलाच्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण सारे कामगार एकत्र येवून आपले कामगाराचे अधिकार शाबूत राखणे हीच डॉ. बाबासाहेब अबिडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज याची जयंती केल्यासारखी आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे पनवेल Dy SS वी. एन. शिदि आणि 'आम्ही भारतीय' वृत्तपत्राचे संपादक बोधराज यांची मार्गदर्शन पर भाषण झाली. अध्यक्षीय भाषणात मी. गौरीशंकर नागदेव म्हणाले डॉ. बाबासाहेब याचे कामगार वर्गासाठी मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी दिलेले हक्क अधिकार शाबूत ठेवण्यासाठी संविधान वाचले पाहिजे. संघटनेच्यावतीने संयुक्त जयंती निम्मित रक्तदान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष मों. गौरीशंकर नागदेव, उपाध्यक्ष वी. एन. गायकवाड, कोषाध्यक्ष धर्मशीग मीना, चंद्रमनी, पन्नालाल गौतम यांनी परिश्रम घेतले.
0 Response to "कामगाराला कोणती जात धर्म नसते, संविधानातील आपल्या न्याय हक्कासाठी एकसंघ झाले पाहिजे - आनंद म्हस्के"
एक टिप्पणी भेजें