तुमसर तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांना टुजी कनेक्टेड ऐवजी फोरजी ई-पास मशीनचे वाटप
दिगंबर देशभ्रतार जेष्ट पत्रकार
तुमसर:- (जिल्हा प्रतिनिधी) :- तुमसर तालुक्यातील संपूर्ण रास्त भाव दुकानदारांना टूजी ऐवजी फोरजी ई पास मशीन चे वाटप करण्यात आले. दुकानदाराकडे यापूर्वी असलेल्या ईपास मशीन जमा करण्यात आलेल्या असून त्या ऐवजी नवीन ईपास मशीन रास्त भाव दुकानदारांना देण्यात आल्या.कारण टूजी कनेक्टेड मशीन यापूर्वी दुकानदारांकडे असल्यामुळे रास्त भाव दुकानदारांच्या अनेक समस्या होत्या व त्यामुळे अनेक लोकांचे मशीनवर अंगठे लागत नव्हते .त्यामुळे राशन दुकानदारांना त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागत होता. परंतु आज देण्यात आलेल्या फोरजी ई पास मशीन मुळे दुकानदारांची परेशानी कमी होईल व कार्डधारकांना मालाचे वाटप शक्य तेवढ्या लवकर होईल या उद्देशाने या मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वजांरी भंडारा,प्रविण अबुंलकर अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी तुमसर तालुका, रहांगडाले इंटेग्र प्रांत अधिकारी,रास्त भाव युनियन अध्यक्ष अरविंद कारेमोरे,जेष्ट पत्रकार दिगंबर देशभ्रतार् ,गुलराज कुदंवानी,आनंद मोहतुरे,ठाकूर वासनीक,भूपत सार्वे,प्रमोद घरडे,नामदेव कांबळे,नदांगवळीभाऊ,कनैया लालवानी,वर्षाताईदेशभ्रतार तालुक्यातील संपूर्ण रास्त भाव दुकानदार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Response to "तुमसर तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांना टुजी कनेक्टेड ऐवजी फोरजी ई-पास मशीनचे वाटप "
एक टिप्पणी भेजें