मास्टर मोहम्मद शरिफ शेख हज यात्रेसाठी रवाना
अनेकांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :- प्रत्येक मुस्लीम अनुयायाला हज बदल धार्मिक भावना असते. मुस्लीम धर्मात सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या " हज" यात्रेसाठी मंगळवार दिनांक २८ मे २०२४ ला खांब तलाव मज्जिद येथून मास्टर मोहम्मद शरिफ शेख रवाना झाले. हज करिता रात्री ११.५५ वाजता विमानाने रवाना झाले आहेत. प्रत्येक मुस्लिम अनुयायाला हज बदल धार्मिक प्रतीक आहे. हज करण्यासाठी जगभरातील मुस्लिम सौदी अरेबियातील मदिना व मक्का शहरात जमतात तेथे हज यात्रेकरू अनेक ४० दिवस मुक्काम करतात. आणि विविध धार्मिक परंपरांचे पालन करतात. हज हा इस्लाम धर्माचा महत्वपूर्ण भाग आहे. ज्यांच्यावर हज फर्ज आहे. त्यांनी एकदा तरी जिवनात हजला जायला पाहिजे. असा इस्लाम धर्माचा नियम आहे. म्हणून भंडारा येथील मोहम्मद शरिफ शेख व कलाम शेख हे हज यात्रेसाठी निघाले. त्यांच्या अरेबियातील मदीना व मक्का रवानगीसाठी हज यात्रेकरूना शुभेच्छा दिल्या आहेत.
हज आणि विविध धार्मिक परंपरांचे यात्रा सुखरूप व्हावी म्हणून त्यांना पालन करतात हज्ज हा इस्लाम धर्माचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्याकरिता मोहम्मद शरिफ शेख व कलाम शेख यांना यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन सेवानिवृत्त केंद्र प्रमुख प्रदिप काटेखाये, पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, राजू सतदेवे, सतिश आठले, देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी चेतन भैरम, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, इक्बाल सिद्दिकी, अविल बोरकर, नरेश बेंदेवार, फय्याज अंसारी, मोहम्मद इम्मु अली, पत्रकार निजामुद्दीन अंसारी, प्रा. शाहनवाज शेख, तौसीफ शेख, निय्याज अली, समसुल हक, कदिरभाई, लियाकतभाई, कलिम खान, प्राचार्य दारूउलूम रजाऐ मुस्तफा मुफ्ती महबुब रजा नूरी, हाफिज अंसारी, युसुफ पाशा खान, नासीर शेख, मौलाना असरफुल हक, इकराम खान, नसीम खान तसेच भंडारा जिल्ह्यातील मित्र मंडळीनी सन्मानपुर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Response to "मास्टर मोहम्मद शरिफ शेख हज यात्रेसाठी रवाना"
एक टिप्पणी भेजें