विठ्ठल रुखमाई विद्यालय भूगाव/मेंढा एस.एस.सी बोर्ड परीक्षेचा निकाल 100 टक्के
भूगांव प्रती :- इयत्ता दहावीच्या परीक्षेत विठ्ठल रुखमाई विद्यालय भूगांव/मेंढा ने यंदाही यशाची परंपरा कायम राखली आहे. कु. चेतना हजारे 89. 20 टक्के गुण मिळविले असून शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला आहे. कु. दामिनी भेंडारकर 88.20 टक्के गुण मिळवून शाळेतून द्वितीय क्रमांक तर कु. लिना दोनोंडे 87. 60 टक्के गुण मिळवून शाळेतून तृतीय क्रमाक व भावेश वाढई याने 86.60 टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक मिळविला आहे .
परीक्षेला एकुण 39 विद्यार्थी बसले होते त्यामध्ये 25 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, 10 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 04 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत . विठ्ठल रुखमाई विद्यालयाने परीसरात दर्जेदार व नाविन्यपूर्ण उपक्रमांनी यशाची परंपरा कायम राखण्यात यश मिळविला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर व संस्थेच्या सचिव डॉ. सौ. वृंदा करंजेकर ,शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील सुपारे सर यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले . तर शाळेचे शिक्षक श्री. दादाराम मोहतुरे , श्री देवेंद्र हटवार , श्री. घनश्याम खंडाईत , प्रमोद ठाकरे , मच्छिद्र गोटेफोडे , तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मुकेश साखरे , पांडूरंग दोनोडे, चंद्रमणी हूमणे, कृष्णवती सिंग यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
0 Response to "विठ्ठल रुखमाई विद्यालय भूगाव/मेंढा एस.एस.सी बोर्ड परीक्षेचा निकाल 100 टक्के "
एक टिप्पणी भेजें