प्रेमलाल गजभिये महाराष्ट्र दिन १ मे पासून जिल्हा अधिकारी कार्यालय समोर उपोषण
---------------------------------------------
भंडारा :- विशेष प्रतिनिधी.संजीव बांभोरे:-प्राप्त् माहीती अनुसार माजी सफाई कामगार प्रेमलाल खत्री गजभिये येथे सण १९८८ मध्ये अस्थाई कामगार म्हणून लागले. त्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थायी पदावर वेतनश्रेणी नियमानुसार कार्यरत करण्यात आले परंतु वेतन श्रेणी अनुसार त्यांना निवृत्त रक्कम राज्य परिवहन मंडळ तुमसर डेपो भंडारा द्वारे कमी देण्यात आले. असता त्यांनी कामगार न्यायालय भंडारा येथे धाव घेतली. दिनांक ३१/०१/२०२४ ला नियमाप्रमाणे मूळ रक्कम तीन महिन्याच्या आत देण्यात यावे असे निकालआदेश निर्गमित करण्यात आले तरीपण राज्य परिवहन मंडळ भंडारा व तुमसर हे जिल्हा अधिकारी व न्यायालयीन आदेशाला टाळा-टाळ करत असल्यामुळे माझे व माझे परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे करितामहाराष्ट्र दिनी१ मे २०२४ ला जिल्हा अधिकारी कार्यालय समोर उपोषण करणार आहे असे माजी सफाई कामगार प्रेमलाल खत्री गजभिये यांनी पत्रका द्वारे कळविले आहे.
0 Response to "प्रेमलाल गजभिये महाराष्ट्र दिन १ मे पासून जिल्हा अधिकारी कार्यालय समोर उपोषण"
एक टिप्पणी भेजें