अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेची चिलगाव येथे सभा संपन्न.
----------------------------------------------
जामनेर ता.प्रतीनिधी :- अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार व राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ पत्रकार संजीव भांबोरे आदेशानुसार अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेची चिलगाव तालुका जामनेर येथे सभा मा. श्री सुधाकर शिंगारे साहेब जिल्हा अध्यक्ष जळगाव यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आली. यावेळी जामनेर तालुका अध्यक्ष जितेंद्र आगळे तालुका उपाध्यक्ष उत्तम इंगळे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सरलाताई भोई जिल्हा उपाध्यक्ष ममताताई राजपूत तालुका महिला आघाडी अध्यक्ष मंगलाताई कोळी तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष ज्योतीताई राजपूत जिल्हा उपाध्यक्ष बापू सोनार जिल्हा सचिव सदानंद मोहिते महिला सचिव स्वातीताई बडगुजर हे सर्व पदाधिकारी हजर होते या वेळी जिल्हा अध्यक्ष सुधाकर शिंगारे साहेब यांनी दिव्यांग बांधवाना शासकीय योजना विषयी मार्गदर्शन केले. व संघटने जिल्हा अध्यक्षाच्यां हस्ते पदाधिकारी यांना संघटनेचे ओळख पत्र प्रदान करण्यात आले. तालुका उपाध्यक्ष उत्तम इंगळे साहेब यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले व दिव्यांग बांधवाना संजय गांधी निराधार योजना. घरकुल. बीज भांडवल कर्ज योजना. रेशन कार्ड. या विषयी मार्गदर्शन केले. तालुका अध्यक्ष जितेंद्र आगळे साहेब यांनी आभार व्यक्त केले व दिव्यांग बांधवाना कोण कोणत्या समस्या आहे हे जाणून घेतले. त्यावर त्यांना काय?. उपाययोजना करता येईल याची माहिती दिली. यावेळी लताबाई कोळी. हिराबाई सरोदे. कौशल्याबाई कोळी. श्रीराम जगताप. साई सरोदे. सांडू तडवी. कौसाबाई जंजाळ. मुकेश गुजर. सुधाकर जाधव. वासुदेव चोधरी.कैलास साबळे.भागवत चौधरी. ज्ञानेश्वर पाटील. काशिनाथ लोहार. आकाश तडवी. सीताराम पाटील. विजय पाटील. निलेश कावडे. निकिता जाधव. अरुणाबाई बडगुजर. सावित्रीबाई कुंभार. अरुण हिवरे व चीलगांव ता.जामनेर येथील दिव्यांग बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Response to " अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेची चिलगाव येथे सभा संपन्न."
एक टिप्पणी भेजें