
महानुभाव पंथीय पदयात्रा कुबेर नगरी तुमसर येथे दाखल
जाळीच्या देव ते डाकराम सुकळी, पायी मार्ग मंडळी सह स्थान वंदन फिरस्ती क्रम प्रवास यात्रेच्या प्रचंड गजरा सह स्वागत.
जाळीच्या देव ते तुमसर ४८४ कि.मी. पायी प्रवास.
श्रीकृष्ण मंदिर तुमसर येथे रात्र मुक्कामी.
भिवगडे स्थानिक मंदिर, दत्तात्रय जुना मंदिर,पंचकृष्ण स्नेह मंडळ,श्रीकृष्ण मंदिर व महादाईसा महिला मंडळ तुमसर द्वारे मोठ्या प्रमाणात स्वागत.
तुमसर (विशेष प्रतिनिधी) :- पायी मार्ग मंडळासह स्थान वंदन फिरस्ती क्रम प्रवास यात्रा श्री क्षेत्र जाळीचादेव ते डाकराम सुकळी पदयात्रा आज कुबेर नगरी तुमसर येथे दाखल झाली असता. पायी यात्रेत महानुभाव पंथीय संत महंत भिक्षुक वासनिकासह श्री क्षेत्र जाळीचा देव ते सावळा द्वारा,नांदुरा जळगाव जिल्हा, अकोट, वडनेर, अष्टमहासिद्धी, रिद्धपूर, सालेबर्डी, काटोल, देवबर्डी ,नागपूर, मनसर, रामटेक ,मौदा, भंडारा मार्गे करत ४८४ कि.मी. चा पायी प्रवास करत पैदल यात्रा कुबेर नगरी तुमसर येथे दाखल झाली.
येथील स्थानिक पंचकृष्ण स्नेह मंडळ, श्रीकृष्ण मंदिर व जुना दत्तात्रय मंदिर, भिवगडे स्थानिक मंदिर तसेच महादाईसा महिला मंडळ च्या वतीने मोठ्या प्रमाणात आतिषबाजी ढोल ताशाच्या गजरासह पुष्पवर्षाव करत मोठ्या प्रमाणात परमेश्वर भक्तिमार्गाच्या संत-महंत साधू भिक्षुक वासनिकांचा स्वागत करण्यात आला.
स्वागत उपस्थिता मध्ये राजू वाहने, सुरेश गायधने, बोंद्रे गुरुजी, मिलिंद गजभिये, हिरा भावसागर, संकेत गजभिये, अशोक क्षीरसागर, भोंडेकर जी, बेसरकर जी, संतू बनसोड, हेमंत गजभिये, लक्ष्मीकांत नागदेवे, नितीन बनसोड ,मधुकर कोहाळे, भिवगडे भाऊ, कृष्णकांत भवसागर, मया चिंधालोरे, हरीष गजभिये, दुर्वास बनसोड, श्रीकृष्ण देशभ्रतार, हर्षवर्धन देशभ्रतार, पंचकृष्ण स्नेह मंडळ तुमसर, श्रीकृष्ण मंदिर पंच कमिटी, दत्तात्रय मंदिर सभासद, महादाइसा महिला मंडळ व असंख्य महानुभाव सदभक्त आदी उपस्थित होते.
पद यात्रेची मुक्कामी व्यवस्था श्रीकृष्ण मंदिर पंच कमिटी व प.पू.आचार्य खुशाल मुनी कपाटे यांनी केली तर श्री तीर्थक्षेत्र जाळीच्या देव ते डाकराम सुकळी पदयात्रेचे आयोजन श्री प.पु. महंत चिंचोडीकर बाबा जाडीच्या देव जि.जालना यांनी केले आहे असे प्रतिनिधी द्वारा कळते.
0 Response to " महानुभाव पंथीय पदयात्रा कुबेर नगरी तुमसर येथे दाखल "
एक टिप्पणी भेजें